शेतकऱ्यांनो या झाडांची शेती करा आणि कमवा 50 ते 60 लाख...

शेतीसोबत जोडव्यवसायचा पर्याय...  लाखो कमवण्याची शेतकऱ्यांकडे ही देखील संधी

Updated: Jun 27, 2022, 09:42 PM IST
शेतकऱ्यांनो या झाडांची शेती करा आणि कमवा 50 ते 60 लाख... title=

पोपट पिटेकर, मुंबई : भारतात अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात. पंरतू शेतकऱ्यांनी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजचं आहे. शेतीसाठी कोणते पूरक व्यवसाय करुन नफा मिळवता येतो याची माहिती शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत शेतीला जोडधंद्याची साथ दिली तर शेतकरी लाखो रुपयांचा नफा कमवू शकतो. कसं ते पाहूयात...

भारतात अनेक झाडांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात तुम्ही निलगिरी झाडांची शेती केली तर चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. निलगिरी झाडांची शेती मोठ्या प्रमाणात भारतात केली जाते. या झाडांच्या शेतीसाठी विशिष्ट हवामान आणि मातीची गरज नसते. निलगिरी झाड हे कुठेही उगवू शकतो. त्यामुळे तुम्ही निलगिरीची शेती कुठेही करु शकता.

भारतात निलगिरी झाडाचं खूप महत्त्व आहे. या निलगिरी लाकडाचं वैशिष्ट म्हणजे हे लाकूड खूप मजबूत असतं. निलगिरी झाडाचं उपयोग घराच्या फनिर्चर पासून पार्टिकल बोर्ड आणि बांधकामांच्या कामासाठी केला जातो. या झाडाच्या शेतीसाठी विशिष्ट हवामान आणि मातीची गरज पडत नाही. या झाडांची शेती कुठेही तुम्ही करु शकता.

निलगिरी रोपांची लागवड

निलगिरी रोपांची लागवड करण्यापूर्वी शेतातील तण पूर्णपणे स्वच्छ करुन घ्यावे. त्यानंतर दोन ते तीन वेळा शेतात चांगली नांगरणी करुन घ्यावी. त्यानंतर रोपे लावण्यासाठी झाडांच्या गरजेनुसार खड्डे खोदणे. खड्डे तयार करुन झाल्यानंतर पूनर्लावणीची प्रक्रिया सुरु करणे. पूनर्लावणीसाठी रोपवाटिकेत बिया टाकून रोपे तयार करुन घेणे. किंवा तुम्ही ही रोपे कोणत्याही नोंदणीकृत नर्सरीमधून विकत आणू शकता.

योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करा

निलगिरीच्या रोपापासून झाडं तयार होण्यासाठी किमान 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागू शकतो. तो पर्यंत तुम्ही दुसरं उत्पन्न मिळवण्यासाठी मोकळ्या जागेमध्ये दुसरं पिक घेऊ शकता. कोंथिबीर, हळदी, अदरक या सारखे पिक तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता.

कमवा 45 ते 55 लाख

निलगिरीची शेती करताना झाडांच्या लागवडीचा खर्च खूप कमी येतो. झाडं लावल्यानंतर निलगिरीच्या झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. पंरतू झाड मोठं झाल्यानंतर एका झाडाच वजन जवळपास 350 किलोपर्यंत असतो. तुम्ही एका हेक्टरच्या शेतात सुमारे एक ते दीड हजार झाडे लावू शकता.  झाड तयार झाल्यानंतर शेतकरी ही लाकडं 45 ते 55 लाख रुपायांना सहज पणे विकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्हालाही आता लाखो रुपयं कमवायचं असेल तर निलगिरी झाडांची शेती करा आणि श्रीमंत व्हा.