डिअर जिंदगी : जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करा

आपण भुतकाळाचा विचार करत, सध्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करतो पण, भुतकाळाला गोंजारत बसण्यात काहीच अर्थ नाही, जे काही आहे ते जे सध्या चाललंय त्यातून योग्य आणि यशस्वी मार्ग काढण्याची गरज आहे.

Updated: Mar 1, 2019, 10:54 PM IST
डिअर जिंदगी : जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करा title=

दयाशंकर मिश्र : असं कोण आहे, ज्याला जीवनातील कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला नाही. जीवनाला या सत्याची परीक्षा द्यावीच लागली. अनेक वेळा लोक असंच म्हणतात, असं झालं असतं तर काय झालं असतं, तसं झालं असतं तर किती बरं झालं असतं. आपण भुतकाळाचा विचार करत, सध्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करतो पण, भुतकाळाला गोंजारत बसण्यात काहीच अर्थ नाही, जे काही आहे ते जे सध्या चाललंय त्यातून योग्य आणि यशस्वी मार्ग काढण्याची गरज आहे.

बॉलीवूडमधून एक छोटासा किस्सा

प्रसिद्ध निर्माता - दिग्दर्शक राकेश रोशन एक अभिनेता म्हणून अधिराज्य गाजवलं. यानंतर त्यांच्या आयुष्यात अपयशाचा टप्पा आला. यानंतर त्यांनी चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांच्या आयुष्यात ग्लॅमर त्यांच्यापासून लांब जात होतं, तेव्हा त्यांचे जवळचे मित्र आणि मीडिया यांनी त्यांच्यापासून तोंड फिरवलं. या दरम्यान निर्माता म्हणून पहिला चित्रपट खुदगर्ज या सिनेमाची रिलीज पार्टी होती. यात अनेक अभिनेते होते. या सिनेमात मुख्य भूमिका जितेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांची होती.

यावेळी एका प्रसिद्ध सिने मासिकाच्या फोटोग्राफरने या पार्टीत जे काही केलं ते राकेश रोशन यांच्यासह अनेकांना धक्का देवून गेलं. कारण या फोटोग्राफरने जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत उभ्या असलेले राकेश रोशन यांना बाजूला होण्यास सांगितलं आणि जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांचा एकत्र फोटो घेतला. यात फोटोग्राफरने असं का केलं, कारण त्याला दोन यशस्वी अभिनेत्यांचा फोटो एकसाथ हवा होता, यात त्यांना अयशस्वी होत असलेले राकेश रोशन नको होते.

जेव्हा त्यांनी राकेश रोशन यांना वेगळं होण्यास सांगितलं, तेव्हा राकेश रोशन यांच्या पत्नीने ते ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. राकेश रोशन यांना देखील ते वाईट वाटलं. पण बदलत्या काळाचं भान ठेवून ते त्या फोटो फ्रेममधून बाजूला झाले. काहीही न बोलत ओलावलेल्या डोळ्यांसह,  मनाला लागलेली ठेच सांभाळून ते थोडे लांब जावून उभे राहिले. या वेळी त्यांचे मित्र जितेंद्र आणि शत्रुघ्न यांना देखील हे आवडलं नाही. पण राकेश रोशन यांना कोणताही वाद नको होता.

काही दिवसानंतर त्यांचा सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन झालं. त्यावेळी सर्व फोटोग्राफर, तसेच त्यांना जितेंद्र, शत्रुघ्न यांच्यासोबतच्या फोटोतून बाजूला करणारा फोटोग्राफरही यात सामिल होता. यावेळी त्यांना
फोटोग्राफर फोटो घेण्यासाठी आग्रह करत होते. यावेळी राकेश रोशन यांनी त्यांच्या पत्नीला इशारा करत सांगितलं, मी पुन्हा या इंडस्ट्रीत आलोय.

राकेश रोशन यांनी पुढील काळात अनेक सुपरहिट सिनेमे केले. यात खून भरी मांग, काला बाजार, किशन कन्हैय्या, करण-अर्जुन, कोई मिल गया, कहो न प्यार है, क्रिश सीरीजसारखे सिनेमे केले. राकेश रोशन यांच्या वाईट काळात मीडियाकडून त्यांना धारेवर धरलं जात होतं, तरी देखील संयम ठेवत त्यांनी मार्ग काढला. राकेश रोशन यांच्या यशामागे हे मोठं कारण आहे. संकटकाळात संयम ठेवून मार्गक्रमण करणे अतिशय महत्वाचे असते.

राकेश रोशन यांच्या पडत्या काळातील हा किस्सा 'सुहाना सफर विद अन्नू कपूर'मधून मिळाला आहे. पण यापेक्षाही अनेक किस्से, कटू अनुभव पचवून ते यशस्वी झाले असतील, ते त्यांनाच माहित.

राकेश रोशन अतिशय लोकप्रिय, यशस्वी व्यक्ती आहेत. यामुळेच हा किस्सा येथे सांगितला. पण खरं पाहिलं तर जीवनात असे असंख्य कटू अनुभव घेतल्यानंतरच अमृत प्राप्त होतं. काही करण्याची, जिद्द पूर्ण करण्याची, स्वप्न पूर्ण कधीही वचनांवर होत नाहीत. अशा वाईट क्षणांसाठी स्वत:ला तयार करण्याची गरज आहे. 

जीवन धैर्याचं नाव आहे. जीवनाला कंटाळणं म्हणजे कुणाला तरी कंटाळून जीवन सरेंडर करणे. कोणत्याही ऋतूत हे शक्य नाही. कारण ऋतूतर बदलत राहतात. पण जीवन जर पटरीवरून खाली घसरलं तर परत येणं कठीण असतं.

हिंदी में पढीए

डियर जिंदगी: कड़वे पल को संभालना!