डिअर जिंदगी : आपण दुसऱ्याचं किती ऐकतो!

जेव्हा शाब्दिक रागापेक्षा आपण, डोळ्याने काम चालवतो, तेव्हा आपल्याला समजत असेल, आपण किती गंभीर स्तरावर पोहोचलो आहोत. आपण आतल्या आत एवढे उकळत आहोत की, आपल्यातील रागाच्या तापमानाला थोडीशी उब मिळाली, तरी आपला 'ज्वालामुखी' व्हायला करतो.

Updated: Sep 22, 2018, 06:53 PM IST
डिअर जिंदगी : आपण दुसऱ्याचं किती ऐकतो! title=

दयाशंकर मिश्र : आपण एक दुसऱ्याचं किती ऐकतो!  ऐकणं तर दूर आपण ऐकलं नाही असं करण्याचा रेकॉर्ड बनवत आहोत. असं काय आहे, जे आपल्याला ऐकण्यापासून दूर नेत आहे. आपण सर्व सखा, मित्र सर्वांचं ऐकण्यापासून दूर जात आहोत. आपण स्वत:ला किती ऐकत आहोत. या बाबतीत देखील दोन मतं आहेत.

न ऐकण्याचं कारण तरी काय आहे?

गोंगाट! कलह. अशांती

आपल्या आसपास दोन प्रकारच्या आवाजाचा कलह वाढत आहे. पहिला बाहेरचा, दुसरा आतला. आपण बाहेरील गोंगाटावर जागृत तर राहतो. पण मनातल्या आतला गोंगाट कधी वाढत जातो, कलह कधी वाढत जातो, त्याचा अंदाज देखील आपल्याला येत नाही. आपण बाहेर-बाहेर पळत असतो. पण आतल्या आत गोंगाट अधिक वाढत असतो. हा गोंगाट जेव्हा या सर्व बाबींची हद्द पार करतो, तेव्हा आपल्या जीवनावर याचा मोठा परिणाम दिसू लागतो.

आपल्या आजूबाजूला, आपली कॉलनी, ऑफिस, परिवारात असे व्यक्ती मिळतील, जे कुणाचं ऐकत नाहीत. असं नाही की ते ऐकत नाहीत, नकार देतात. पण ते एखादी बाब स्वीकारताना दिसत नाहीत. एखादी असुविधा त्यांच्या मनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसायला लागते की, त्याचा परिणाम हिेसेंच्या स्वरूपात दिसायला लागतो.

लहान मुलं नेहमी सांगतात की, त्यांचे आईवडील त्यांचं ऐकतंच नाहीत. लहान-लहान गोष्टींवरून रागवतात. थोड्याशा कारणावरून मारहाण करतात. घरात काम करणारे, सहाय्यक म्हणतात, साहेब आणि मॅडम थोड्या थोड्या गोष्टींवरून संतापतात. मारहाण करायला तयार होतात. याचा पुढचा भाग घरगुती हिसेंच्या रूपात देखील दिसून आला आहे.

आपल्या संवेदनांचा स्थर गूगल मॅप होत चालला आहे. हा मॅप आपल्याला घर ते ऑफिस पोहचवण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही दाखवत, तर सर्वात लवकर पोहोचवणारा दाखवतो. पण होतं एक, दोन मिनिटात अंतरामुळे आपण काही रस्ते सोडून देत आहोत, जे चांगले आहेत, किंवा ज्या रस्त्याने प्रवास करणे सोयीचं आहे.

किती मजेदार आहे हे, आपण येता जाता, मिनिटा मिनिटात एका मॅपवर नजर लावून असतो, तर दुसरीकडे आणि दिवसभरात आपण कित्येक गोष्टी अशाच करत राहतो. त्या आपण कधी मोजत नाहीत. या घाईगडबडीने आपल्या जीवनातील खूप सारं सुख शोषून घेतलं आहे.

दुसऱ्यांना न ऐकण्याचं कारण देखील हे आहे की, आपण आतल्या आत भरत आहोत. हे भरणं जेव्हा भयानक स्तरावर जावून पोहोचतं, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतो. आपल्या गाडीला कुणी सहज ओव्हरटेक करत असेल, तर आपल्याला राग आणि हिसेंची अनावश्यक शक्ती वाढत असते. अनेक वेळा रस्त्यावर गाडी चालवताना, आपल्याला दुसऱ्या वाहन चालकाच्या डोळ्यातील भाव देखील राग आणतात.

जेव्हा आम्ही राग देण्याच्या जागी, आता शब्दांच्या जागी डोळ्याने काम चालवत असू तेव्हा आपल्याला समजत असेल, आपण किती गंभीर स्तरावर पोहोचलो आहोत. आपण आतल्या आत एवढे उकळत आहोत की, आपल्यातील रागाच्या तापमानाला थोडीशी उब मिळाली, तरी आपला 'ज्वालामुखी' व्हायला करतो.

आपला राग, आतल्या आत वाढणारा कलह संभाळावा लागेल. थोडं थांबून, काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे, समजून घेण्यासाठी संयम पाहिजे. या अनियंत्रित राग एखाद्या दिवशी आपल्याला अडचणीत आणू शकतो, दुसरे तर दुरंच पण आपल्या जीवानात तो सुख, शांती सोडून चिंता आणि उदासीन करू शकतो.

इसलिए, आपला राग, शांती याची प्रत्येक दिवशी समिक्षा करा. राग कमी करून शांततेकडे वाटचाल करा.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)