Sabudana Thalipeeth Recipe in marathi: काही तासांवर आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) येऊन ठेपली आहे. सर्व एकादशींमध्ये या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक घरी विठुरायाची पूजा करतात. तसेच या एकादशीला व्रताला विशेष महत्त्व आहे. उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडीची आठवत. मात्र यंदाच्या आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ (Sabudana Thalipeeth ) बनवून बघा. जाणून घ्या यासाठी सोपी रेसिपी....
उपवास म्हटलं की घरातील प्रत्येकाला मसालेदार, चमचमीत पदार्थ खायला आवडतात आणि त्यात साबुदाण्याचे पदार्थ म्हणजे सगळ्यांचेच आवडते. आषाढीसाठी घरच्या घरी साबुदाण्याची खिचडी बनवण्याची तयारी मनोरंजक आहे, पण आज आपण साबुदाणा खमंग थालीपीठ रेसिपी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत.
भिजवून ठेवलेले साबुदाणे - 3 वाटी
उकडलेले बटाटे - 3
हिरव्या मिरच्या - 5 ते 6
शेंगदाण्याचे कूट - 1 वाटी
मीठ- चवीनुसार
तेल/तूफ - अंदाजानुसार
लिंबाचा रस - 1 टेबलस्पून
थालीपीठासाठी प्लास्टिक शीट
वाचा: आषाढी एकादशीनिमित्त बनवा खास रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल
- सर्व प्रथम साबुदाणा पाण्यात भिजवून घ्यावे. पाणी काढून टाकल्यानंतर साबुदाणा 3 ते 4 तास चांगले भिजत ठेवावे.
- शेंगदाणे तव्यावर हलके भाजून हातावर चोळून त्याची सालं काढावीत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- हिरवी मिरचीही मिक्सरमध्ये पेस्ट करा.
- त्यानंतर बटाटे व्यवस्थित उकडून घ्यावे आणि नंतर एका डिशमध्ये कुस्करुन घ्यावे.
- त्यानंतर त्यात साबुदाणा, हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घाला.
- सर्व मिश्रण हाताने मळून घ्यावे.
- तयार मिश्रणाचे गोळे बनवा.
- या तयार पिठाचे थालीपीठ थापताना पोलपटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा सुती रुमाल पाण्यात भिजवून ओला करुन अंथरावा.
- त्यानंतर त्यावर अलगद हातानी थालीपीठ थापून घ्यावे. थालीपीठ थापताना हाताला थोडे पाणी लावावे.
- थालीपीठ थापून गोलाकार आकारात घेतल्यानंतर ताव्यावर खरपूस भजून घ्या.
- थालीपीठाच्या मध्यभागी एक छिद्र करा.
- तव्यावर, तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप सोडा आणि दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर थालीपीठ भाजून घ्या.
- उपवासासाठी तयार केलेला साबुदाणा थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करा.