मुंबई : इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटच्या २०१९ मधील कॉस्ट ऑफ लिविंग सर्वेक्षणात पॅरिस, सिंगापूर आणि हाँगकाँग हे जगातील सर्वात महागडे शहर असल्याचं समोर आलं आहे. तर भारतातील दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरु हे स्वस्त शहरांध्ये आहेत. 'सीएनएन'ने वर्षभरात केलेल्या या सर्वेक्षणात राहण्यासाठी पॅरिस, सिंगापूर आणि हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर असल्याचं म्हटलं आहे.
या सर्वेक्षणात १३३ शहरांमधील १५० वस्तूंचं मुल्यांकन तपासलं गेलं. स्विट्झरलँडमधील ज्यूरिख हे शहर या यादीत चौथ्या स्थानावर तर जेनेव्हा आणि जपान मधील ओसाका शहर पाचव्या स्थानावर आहे.
दक्षिण कोरियातील सिओल, डेनमार्कमधील कोपेनहेगन आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क हे सातव्या स्थानावर आहे. सगळ्यात महागड्या शहरांमध्ये 10 व्या स्थानावर अमेरिकेतील लॉस एंजिलस आणि इस्राईलमधील तेल अवीव हे शहर आहे.
जगातील सर्वात स्वस्त शहरांमध्ये कराकस (व्हेनेजुएला), दमिश्क (सिरिया), ताशकंद (उज्बेकिस्तान), अलमाटी (कजाकिस्तान), कराची (पाकिस्तान), लागोस (नायजेरिया), ब्यूनस आयर्स (अर्जेंटीना) आणि भारतातील बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे.