मुंबई : सध्या लोकांचं जिममध्ये जाण्याचा कल वाढला आहे. लॉकडाऊननंतर जास्तीत जास्त तरुणाई आपल्या फिटनेसवरती लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे काही लोक निरोगी शरीरासाठी, तर काही फक्त ट्रेंड म्हणून जिम करतात. बरेच लोक जिम करताना आपल्यामध्ये किती ताकत आहे आणि आपण किती फिटनेस फ्रिक आहोत, हे दाखवण्यासाठी जिममधील फोटो, व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात. परंतु लोक यासगळ्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि खूप मोठी चूक करुन बसतात.
हे लक्षात घ्या की, जिममध्ये वर्कआऊट करताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे, अन्यथा आपल्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला. जेथे ही महिला एका अपघाताला बळी पडली, ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला आहे.
खरेतर हा व्हिडीओ मेक्सिकोमधील आहे. परंतु हा व्हिडीओ प्रत्येक जिम करणाऱ्या लोकांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आला आहे.
मेक्सिकोमधील एक महिला जीममध्ये वर्कआउट करण्यासाठी गेली होती. महिलेने उत्साहाने अधिक वजन उचलण्यासाठी गेली, त्यामुळे त्याचा एक वेदनादायक अपघात झाला. 180 किलो वजनाच्या बारबेलखाली दबल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु काही गाइडलाईनखाली हे व्हिडीओ सुरू होत नाहीयत.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, महिला आपल्या मुलीसोबत फिटनेस सेंटर म्हणजेच जिममध्ये गेली होती. जिममध्ये तिने 180 किलो वजनाचा बारबेल उचलण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्याच क्षणी ती खाली पडली. महिला खाली पडताच 180 किलो वजनाचा बारबेल थेट तिच्या मानेवर पडला, ज्यामुळे काही सेकंदतच महिलेचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे हे सर्व इतक्या झपाट्याने घडले की जवळ उभे असलेले लोक इच्छा असूनही या महिलेला वाचवू शकले नाहीत. अपघातानंतर जिममध्ये एकच खळबळ उडाली. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही.
Mum's attempt to lift 180kg barbell the weight of a gorilla ends in tragic deathhttps://t.co/OlsJtI2iHV pic.twitter.com/tq2Q3jId6X
— Daily Star (@dailystar) February 23, 2022
21 फेब्रुवारीला घडलेली ही घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील सावध व्हा आणि कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय याप्रकारची चुक करु नका. लक्षात ठेवा तुमचा जीव महत्वाचा आहे.