Shhhshh तिथं कोणतरी आहे... कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळं जगातील सर्वात निर्मनुष्य जागा वळवतेय नजरा

What Is Point Nemo: अनेकदा आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी जातो, तेव्हा जरा जास्तच सतर्क असतो. आजुबाजूला घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर आपली नजर असते. पण, जगात एक अशी जागा आहे, जिथं कोणीही नसताना सुरु असणाऱ्या हालचाली थांबतच नाहीत.   

Updated: Apr 27, 2023, 12:05 PM IST
Shhhshh तिथं कोणतरी आहे... कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळं जगातील सर्वात निर्मनुष्य जागा वळवतेय नजरा  title=
(परतिकात्मक छायाचित्र)/ What Is Point Nemo the place on earth where nobody lives know details

What Is Point Nemo: अनेकांनाच अंधाराची भीती वाटते, कोणाला एकटेपणाची सवय नसते, तर कोण सोसाट्याचा वारा सुटला की घाबरून जातं. काहींच्या हृदयाचे ठोके वेग धरतात. समजा तुम्हाला या साऱ्याची भीती वाटत असतानाच जगातील एका अशा ठिकाणावर नेलं जिथं कुणीच राहत नाही, तर? तर पुढे काय होईल याचं उत्तर तुमच्याकडेही नाहीये ना? 

जगातील, तुमच्या देशातील किंवा तुमच्या शहरातील अशात काहीशा Haunted ठिकाणांविषयी तुम्ही वाचलं, लिहिलं किंवा ऐकलंही असेल. किंबहुना काहींनी प्रत्यक्षात हे अनुभव घेतलेही असतील. मुळात अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण, वास्तवाच्या जवळ नेणारी अशीच एक जागा पृथ्वीवर अस्तित्वात आहे, जी आजही तितकीच रहस्यमयी आहे. तुम्हाला हे ठाऊक होतं का? मानवी आयुष्याची चाहूलही नसणाऱ्या या ठिकाणाचा वापर संशोधकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो असं म्हणतात. 

पॉईंट निमो आणि तो आवाज... 

पृथ्वीवर असणारी सर्वात निर्मनुष्य जागा पॉईंट निमो/ नेमो या नावानं ओळखली जाते. 1992 मध्ये सर्वे इंजिनियर Hrvoje Lukatela यांनी या ठिकाणाचा शोध लावला होता. त्या क्षणापासून हे निर्मनुष्य स्थळ जगासमोर उघड झालं. चिटपाखरुही नसणाऱ्या या ठिकाणी म्हणे अंतराळातील उपग्रह पाडले जातात. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत इथं शेकड्यानं अंतराळयानांचा कचरा गोळा झाला आहे. इथून हजारो किलोमीटर अंतरापर्यंत फक्त हा Sattelite Scarp च पाहायला मिळत आहे. 

इथून अंतराळ अवघ्या काहीच अंतरावर... 

जाणून आश्चर्य वाटेल, पण पॅसिफिक महासागरात असणाऱ्या पॉईंट निमो या जागेची आणखी एक ओळखही आहे. हे ठिकाण ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि न्यूझीलंडच्या मधोमध असन त्यावर कोणत्याही राष्ट्राचा हक्क नाही. समुद्राच्या मध्यभागी असणाऱ्या या ठिकाणापासून जमिनीचा पृष्ठ साधारण 2700 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर, या ठिकाणापासून अंतराळाचं विश्व, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन अवघ्या 400 किलोमीटरवर आहे. 

What Is Point Nemo the place on earth where nobody lives know details

कानठळ्या बसवणारा तो आवाज कोण काढतं? 

पॉईंट निमो हे स्थान आजही अतिशय रहस्यमयी असून त्यासंदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळू शकलेली नाहीत. इथली माहिती वाचूनच अनेकांच्या अंगावर काटाही उभा राहतो. 1997 च्या सुमारास संशोधकांनी पॉईंट निमोच्या पूर्वेकडे जवळपास 2 हजार किलोमीटरच्या अंतरावर एक असा आवाज ऐकला तो कानठळ्या बसवणारा होता. 

हेसुद्धा वाचा : भारीये हे! जगातील 'या' देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर

देवमाशाच्या किंकाळीप्रमाणं आवाज झाला आणि त्यानं अनेकांनाच पेचात पाडलं. काहींना वाटलं हा दुसऱ्या विश्वाचाच आवाज आहे, काहींना इतकंही उत्तर देता येईना. काहींनी तर याबाबत चित्रविचित्र तर्कही लावले. एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार इथं अनेक पर्वतकडे तुटतात आणि त्यामुळंच हा आवाज होतो. पण, आवाजामागचं हे कारण अनेकांच्या आजही पचनी पडलेलं नाही.