जगातील या देशात परंपरा आणि Sex Education च्या नावाखाली... पाहुण्यांकडून नववधूची छेडछाड

प्रत्यक्षात या परंपरेमुळे स्त्रिया लैंगिक हिंसाचाराचा बळी पडतात.

Updated: Jul 28, 2021, 10:05 PM IST
जगातील या देशात परंपरा आणि Sex Education च्या नावाखाली... पाहुण्यांकडून नववधूची छेडछाड title=

मुंबई : जगात इतक्या जाती धर्माचे लोकं राहाताता ज्यांच्यामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात, तर काही लोकांच्या वेगवेगळ्या परंपरा ही असतात, ज्या आपल्याला माहिती देखील नसतात. चीनमधील लोकांमध्ये लग्नाची अशीच एक परंपरा आहे, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण त्यांच्यामध्ये विवाहादरम्यान एक विधी आहे, ज्यामध्ये वधू आणि तिच्या मैत्रिणीची लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली छेडछाड केली जाते. तर काही वेळा त्यांना मद्यपान करण्यास भाग पाडले जाते. चीनच्या अनेक भागांमध्ये शतकानुशतके चालत आलेल्या या परंपरेला आता महिलांनी विरोध करण्यास सुरवात केली आहे.

चीनच्या या विचित्र परंपरेला 'नावहुन' असे म्हणतात. ज्यात वधू आणि कधीकधी तिच्या मैत्रिणीची छेडछाड केली जाते. यामध्ये कधीकधी मुलीला मद्यपान करण्यास भाग पाडले जाते. यामागचे असे कारण आहे की, या प्रथेमुळे वधूला तिच्या नवरा सोबत राहाणे सोपे होते त्याचबरोबर तिला लैंगिक शिक्षणामुळे तिला नवऱ्यासोबत राहाणे सोयीस्कर करते. परंतु प्रत्यक्षात या परंपरेमुळे स्त्रिया लैंगिक हिंसाचाराचा बळी पडतात.

चीनच्या या विचित्र परंपरेचा निषेध म्हणून महिलांनी याला विरोध करण्यासाठी या विरोधात आवाज उठवाण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे चिनमधून अशी अनेक प्रकरणे सध्या समोर आली आहेत, ज्यात लग्नापूर्वी वधूने या 'नावहुन' विरुद्ध लेखी करार केला आहे.

whatsonweibo.comच्या अहवालानुसार, एका सर्वेक्षणातील 70 टक्क्यांहून अधिक लोकांनी या चीनी परंपरेला लाजिरवाणे म्हटले आहे, तर 5.2 टक्के लोक म्हणाले की, ही चीनी विवाहसोहळातील पारंपारिक विधी आहे, त्यामुळे याबद्दल फारसे गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही.

तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की, ही विधी वधूला लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच चुकीच्या गोष्टीचा निषेध करण्याची संधी देते.

चीनमध्ये लग्नाच्या वेळी सेक्स एज्यूकेशनच्या नावाखाली वधू आणि तिच्या मित्रांसमोर अश्लील लोकांची गाणी गायली जातात. ज्यामध्ये वराला वधूच्या शरीरावर आकर्षित होण्यासाठी प्रेरित केले जाते. यासाठी कधीकधी चिनी पाहुणे वधू-वरांच्या बेडरूममध्ये देखील यासाठी पोहोचतात.

ही परंपरा संपूर्ण चीनमध्ये नाही, परंतु बर्‍याच भागांमध्ये हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार अजूनही सुरू आहे. इ.स.पू. 221-207 पासून ही परंपरा सुरु आहे. चिनमध्ये हॅन साम्राज्य असताना ही परंपरा सुरू झाली. तेव्हा मुली लहान असताना त्याचे लग्न व्हायचे ज्यामुळे त्या लहान मुलांना सेक्स एज्युकेशन देण्यासाठी ही परंपरा चालवली जायची.