पहिल्यांदाच आई झाली ही Beluga Whale, जन्माला येताच पिलानं केलं सर्वांना हैराण

१५ तासांच्या प्रसूतकळांनंतर... 

Updated: Aug 31, 2020, 04:15 PM IST
पहिल्यांदाच आई झाली ही Beluga Whale, जन्माला येताच पिलानं केलं सर्वांना हैराण  title=
छाया सौजन्य- ट्विटर

नवी दिल्ली : सोशल मीडियायवर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडिओंच्या गर्दीत एक असा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधय ज्यामुळं अनेकांच्या चेहऱ्यावर कुतूहलपूर्ण स्मित येत आहे. हा व्हिडिओ पोस्ट केला आहे अमेरिकेच्या शेड ऍक्वेरियमनं Shedd Aquarium. या मत्सालयात असणाऱ्या एका बेल्युगा व्हेल माशाची पहिल्यांदाच प्रसूती झाली आहे. याचबाबतचा एक व्हिडिओ सध्या निसर्गाची एक वेगळी किमया सर्वांपुढं आणत आहे. 

१५ तासांची प्रसूती...

पांढऱ्या रंगाची बेल्युगा व्हेल हा माशांच्या प्रजातीमधील एक अत्यंत सुंदर मासा आहे. आर्क्टीक महासागर, उत्तर अमेरिका, रशिया आणि ग्रीनलँडच्या समुद्रामध्ये Beluga Whale आढळते. सोशल मीडियावरुन सध्या भेटीला आलेल्या या व्हेलचं नाव बेला असं आहे. शेड अक्वोरियम हेच तिचं वास्तव्याचं ठिकाण. याच मत्सालयाकडून बेलाच्या प्रसूतीची माहिती देत एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये जवळपास १५ तासांच्या प्रसूतकळांनंतर बेलानं पिलाला जन्म दिल्याचं सांगण्यात आलं. 

जन्माला येताच पिलानं.... 

शेड अक्वेरियमनं ही आनंदाची बातमी देत या पिलाचा जन्म अतिशय खास पद्धतीनं झाल्याचं सांगितलं. असं म्हटलं जात आहे की पहिल्यांदा या पिलाचं डोकं बाहेर आलं. सहसा याउलट प्रक्रिया होते. या पिलाचं वजन १३९ पाऊंड इतकं असून, लांबी ५ `३ `` इतकी आहे. या बिलाच्या जन्मामुळं सारेच हैराण आहेत. 

 

नेटकऱ्यांमध्ये उत्साह... 

१४ वर्षीय बेला ही पहिल्यांदाच आई होत आहे. १.२९ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तिची प्रसूती पाहताना त्या ठिकाणी असणाऱ्यांसोबतच सोशल मीडियावरील नेटकऱ्यांमध्येही एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.