ब्रह्मांडामध्ये 13000000 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? शास्त्रज्ञांनी Photo दाखवत सांगितली भारावणारी गोष्ट

James Webb Telescope Image: अवकाशात क्षणाक्षणाला बदलणारं चित्र सध्या संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय असून याच अवकाशातील एक कमाल गोष्ट नुकतीच शास्त्रज्ञांनी जगासमोर आणली आहे.  

सायली पाटील | Updated: May 27, 2024, 01:53 PM IST
ब्रह्मांडामध्ये 13000000 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? शास्त्रज्ञांनी Photo दाखवत सांगितली भारावणारी गोष्ट  title=
watch first galaxies in the universe captured by James Webb Space Telescope

James Webb Telescope Image: जगाच्या उत्पत्तीच्या वेळी अवकाशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या होत्या? या विश्वातील असंख्य तारे आणि लहानमोठ्या ग्रहांची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीच्या कक्षेबाहेर आणखी कोणत्या ग्रहावर मानवी जीवनाचे पुरावे आहेत या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सध्या देशोदेशीचे शास्त्रज्ञ प्रयत्न करतान दिसत आहेत. त्यातच आता जगातील सर्वात मोठ्या आणि अवकाशातील अनेक बारकावे टीपणाऱ्या जेम्स वेब टेलिस्कोपच्या माध्यमातून टीपलेल्या एका दृश्याची भर पडली आहे. 

जेम्ब वेब टेलिस्कोपच्या माध्यमातून टीपण्यात आलेल्या या दृश्यामध्ये जगातील पहिली आकाशगंगा साकारली जात असताना अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अद्भूत छायाचित्रातील दृश्य साधारण 13300000 ते 13400000 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

प्राथमिक माहितीनुसार Big Bang च्या काही कोटी वर्षांनंतर आकाशगंगांच्या निर्मितीस सुरुवात झाली होती. कॅस्पर एल्म हेन्ट्ज यांच्या नेतृत्त्वाअंतर्गत नासाची ही मोहिम पार पडली असून, अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून आकाशगंगेच्या उत्त्पत्तीदरम्यानची ही पहिली थेट छायाचित्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : Cyclone Remal : वादळं किती प्रकारची असतात? जाणून घ्या कशी ठरते त्यांची तीव्रता 

संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार आकाशगंगेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम हायड्रोजननं ब्रह्मांडात प्रवेश केला आणि प्रकाशाच्या मार्गात अडथळा निर्माण केला. या विश्वासंबंधीची बहुतांश माहिती प्रकाशाच्याच माध्यमातून मिळते, पण प्रकाशापुढे अडथळा आल्यामुळं विश्वाच्या उत्पत्तीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलची माहिती मिळवण्यात मात्र आपण अपयशी ठरल्याची माहिती संशोधकांनी दिली. पण, हायड्रोजनचा धुक्यासम थर दूर करण्यासाठीच जेम्स वेबची निर्मिती करण्यात आली होती आणि अखेर या दुर्बिणीच्या माध्यमातून ते साध्य झालं. 

कसं टीपलं हे भारावणारं दृश्य? 

JWST च्या माध्यमातून ब्रह्मांडाला इंफ्रारेड वेवलेंथ्सच्या रुपात पाहिलं जातं. याच माध्यमातून विश्वाची निर्मिती नेमकी कशी झाली यासाठी अनेक शास्त्रज्ञ निरीक्षणपण अभ्यास करताना दिसत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निरीक्षणानुसार ही प्रक्रिया अतिशय अद्भूत आणि तितकीच अतिप्रचंड स्वरुपात घडली, जिथं सुरुवातीला धुकं दूर होऊन पुढं कासवगतीनं या ब्रह्मांडानं आकार घेण्यास सुरुवात केली आणि आज आपण ते विश्व पाहू शकतो ते साकारलं गेलं. 

Cosmic Dawn 

दरम्यान, सध्याच्या घडीला समोर आलेलं दृश्य Cosmic Dawn म्हणून ओळखलं जात आहे. इथं तीन आकाशगंगांमधून मिळणारे सिग्नल अधोरेखित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार हे सिग्नल तटस्थ हायड्रोजन वायूतून आले होते. आकाशगंगांच्या चारही बाजूला असणाऱ्या याच वायूनं सर्व प्रकाश शोषून त्यानंतर तो उत्सर्जितही केला. संशोधकांच्या निरीक्षणानुसार बिग बँगच्या साधारण 400 ते 600 वर्षांपूर्वीपासूनच आकाशगंगांचं अस्तित्वं होतं. ज्यामुळं सध्या समोर आलेली दृश्य ही ब्रह्मांडाच्या साधारण 13300000 वर्षांपूर्वीची असल्याची प्राथमिक शक्यता आहे.