Pakistan Soldiers Dead Body: देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या जवानांप्रती देशाच्या जनतेच्या मनात अमाप प्रेम आणि आदराची भावना असते. आपल्या सुखाचा त्याग करत इतरांसाठी कर्तव्यात तत्पर असणारी ही मंडळी कायमच महत्त्वं घेऊन जातात. पण, दुर्दैवानं सर्वच देशांमध्ये असं चित्र पाहायला मिळेलच असं नाही. कथित स्वरुपात पाकिस्तानचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळं नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
लष्कराच्या सेवेत असणाऱ्या सैनिकांची ही विटंबनाच आहे असं म्हणत नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात शेअर केला आहे. या व्हिडीओमधील दृश्यांमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार पाकिस्तानी लष्कराचे जवान शहीद जवानांचे पार्थिव चक्क गाढवांवर वाहून नेत आहेत. खैबर पख्तून्वा प्रांतात हा संपूर्ण प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुन्वा प्रांतामध्ये मागील महिन्याभरात 100 हून अधिक जवान शहीद झाले. उपलब्ध माहितीनुसार दहशतवाद्यांशी दोन हात करतानाच या जवानांनी प्राण गमावले, पण पाकिस्तान सरकारनं मात्र ही आकडेवारी आणि लष्करासंदर्भातील ही संपूर्ण माहिती लपवण्याचा प्रयत्न केला.
सामान्य नागरिकांपर्यंत लष्कर आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष आणि त्यानंतर झालेल्या रक्तरंजित प्रकरणाची माहिती पोहोचू नये यासाठी पाकिस्तान प्रशासनानं घटनास्थळावरून तातडीनं जवानांचे पार्थिव हटवण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे. अति घाईनं हे जवान गाढवांच्या पाठीवर लादून जवानांचे पार्थिव जंगलाच्या वाटेनं दुसऱ्या ठिकाणी नेताना दिसत आहेत. लष्कराच्याच दुसऱ्या तुकडीला ज्यावेळी हा प्रकार दिसला तेव्हा त्यांनी या घटनेचा व्हिडीओ काढत या जवानांमध्येच शाब्दिक बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं.
Pak Army carries its dead soldiers on donkeys in Tirah valley of Paktunkhwa
Pak military mafia, owning $200 billion business empire, has funds to ferry Generals & their families to play golf elsewhere but couldn't afford to send a helicopter to transport its fallen soldiers.. pic.twitter.com/OG9LKxGPsz
— Nighat Abbas (@Nighat_Abbass) November 20, 2024
लष्करात घडणाऱ्या या प्रकरणाची माहिती उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना मिळताच लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांनी यावर तातडीनं कारवाई करावी असे आदेश दिले, ज्यानंतर पाकिस्तान सरकारनं तातडीनं एक उच्चस्तरीय बैठकही बोलवली.