Video : युद्धादरम्यान एक अशी विलक्षण प्रेम कहाणी; तुमचेही डोळे पाणावतील

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सगळ्यांचं मन जिंकून घेत आहे. 

Updated: Aug 6, 2022, 11:50 AM IST
 Video : युद्धादरम्यान एक अशी विलक्षण प्रेम कहाणी; तुमचेही डोळे पाणावतील title=
viral video in between russia ukraine war will touch your heart to see raescuer propose girlfriend in marathi

Viral Video : प्रेम आणि युद्धात सगळं काही माफ असतं. सोशल मीडियावर प्रेमी युगुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सगळ्यांचं मन जिंकून घेत आहे. रुस आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असताना एक हृदस्पर्शी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्यार किया तो डरना क्या...असंच काहीस या व्हिडीओमधून दिसून येतं आहे.

प्रेमात सब चलता है!

म्हणतात प्रेमात असलेल्या माणसाला कसलीही भीती वाटतं नाही. प्रेमी युगुल प्रेमात पागल असतात असं म्हणतात. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून याचा प्रत्यय येतो. हा व्हिडीओ तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, यात शंका नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, युद्धाच्या सायरनमध्ये एक प्रियकर गुडघ्यावर बसून मैत्रिणीला प्रपोज करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या जोडप्यासोबत अतिरिक्त बचाव पथक त्यांचा प्रेमांचे साक्षीदार होत आहे. हा आनंदाचा क्षण अनेक जण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. सोबत या प्रेमळ जोडप्याचं कौतुक करताना दिसत आहेत. 

''युद्ध आणि जीवनाचं संतुलन''

युक्रेनचे अंतर्गत व्यवहार सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, हे आमचं सध्याचं वास्तव आहे. आम्ही आता वॉर-लाइफ बॅलन्सला सध्या गंमतेती घेत आहोत. युद्धाच्या दरम्यान हा बचावकर्ता लोकांना वाचवत होता. पण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो प्रपोज करत आहे. युद्धाचा सायरन पहिले आमच्यासाठी धोक्याची घंटा वाटायची. पण आता हा आनंदाचा आवाज वाटतो आहे. हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेले आहे आणि आता युक्रेनमधील युद्धामुळे कोणाचं जीवन अस्पर्श नाही राहिलं. 

हृदयस्पर्शी व्हिडीओ तुफान व्हायरल

30 जुलैला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 22 हजार वेळा पाहिला गेला आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया केल्या जात आहे. काही यूजर्सने दिलवाला एमोजी शेअर केला आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाने त्यांच्या देशावर आक्रमण केल्यानंतर असंख्य युक्रेनियन जोडप्यांनी इगेंजमेंट तर काहींनी लग्न करु घेतलं होतं. या युद्धात हजारो लोक मारली गेली तर लाखो लोक विस्थापित झाली.