फेसाळलेल्या समुद्र किनारी खडकावर ते दोघे... (व्हिडिओ)

विवाहासारख्या नाजूक क्षणांच्या आठवणी संग्राह्य ठेवण्यासाठी कॅमेरा मोलाची मदत करतो. अशा वेळी कॅमेऱ्यासमोर पोज देणे हा प्रत्येक नवदाम्पत्यासाठी महत्त्वाचा आणि तितकाच रोमॅंटीक क्षण. पण, हा क्षण साजरा करताना गफलत झाली तर...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 6, 2017, 08:49 PM IST
फेसाळलेल्या समुद्र किनारी खडकावर ते दोघे... (व्हिडिओ) title=

सिडनी : विवाहासारख्या नाजूक क्षणांच्या आठवणी संग्राह्य ठेवण्यासाठी कॅमेरा मोलाची मदत करतो. अशा वेळी कॅमेऱ्यासमोर पोज देणे हा प्रत्येक नवदाम्पत्यासाठी महत्त्वाचा आणि तितकाच रोमॅंटीक क्षण. पण, हा क्षण साजरा करताना गफलत झाली तर...

या व्हिडिओत एका नवदाम्पत्याची अशीच एक गफलत दिसत आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. व्हिडओत दिसणारे कपल हे नेमके कुठले आहे, याबाबत फारशी माहीती नाही. पण, हे कपल प्री-वेडिंग फोटोशूट करत होते. आणि ते करत असतानाच त्यांच्यासोबत हा प्रसंग घडला आहे.

फोटोशूट दरम्यान हे कपल फरफेक्ट शॉटसाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी जे ठिकाण निवडले होते तेसुद्धा अगदी निसर्गरम्य समुद्र किनारा. बॅकग्राऊंडला फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा आणि किनाऱ्यावरील खडकावर ते दोघे. त्यात फोटोग्राफर त्यांच्या मदतीला.

... आता त्यांची फोटोग्राफी ऐन रंगात आली होती. दोघेही रोमॅंटीक मूडमध्ये होते. आणि अचानक घात झाला. समुद्राची लाट आली आणि तिचा पाय घसरला. ती थेट पाण्यात पडली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पण, अनेकांनी दुख: व्यक्त केले आहे की, बिच्चारीचा वेडिंग गाऊन खराब झाला....