घरात केसांना कलर करणं पडलं महागात, तरुणाची झाली अशी अवस्था.. अशी चूक तुम्ही करु नका

सोशल मीडियावर एका तरुणाने केसांना कलर केल्यानंतर झालेल्या अवस्थेचा अनुभव आणि फोटो शेअर केला आहे. बाजारात मिळणाऱ्या हेअर कलरमध्ये असलेल्या केमिकलची त्या तरुणाला एलर्जी होती. याचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर झाला. 

राजीव कासले | Updated: Aug 5, 2023, 06:32 PM IST
घरात केसांना कलर करणं पडलं महागात, तरुणाची झाली अशी अवस्था.. अशी चूक तुम्ही करु नका title=

Viral News : आजची तरुण पीढी आपल्या फिटनेसबाबत, आपल्या दिसण्याबाबत प्रचंड जागरुक झाली आहे. लेटेस्ट फॅशनचे कपडे, ट्रेंडी हेअर कट करणं किंवा दाढी ट्रीम करणं यावर तरुण पिढी जास्त लक्ष देताना दिसतेय. अशातच सध्या केसांना वेगवेळ्या रंगाने रंगवायचा ट्रेंडही आजच्या तरुणाईत (Youngstar) दिसतो. आपल्या नैसर्गिक केसांवर अनेकजण वेगवेगळ्या रंगाचे (Hair Dye) प्रयोग करत असतात. त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन केस डाय करतात. सध्या बाजारात अनेक कंपन्यांची प्रोडक्टसही आले आहेत. या रेडीमेड डायद्वारे अगदी काही मिनिटात केसांना कलर केलं जातं. 

अगदी सोप्या पद्धतीने आणि स्वस्तात घरच्या घरी केस कलर करत येत असल्याने अनेक जणं पार्लरमध्ये जाणं टाळतात. पण हा स्वस्ताला प्रयोग कधी कधी हानीकारकही ठरु शकतो. बाजारात मिळणाऱ्या हेअर कलर्सच्या पाकिटात काही अशी केमिकल असतात जी शरीराला हानीकारक ठरु शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार एका तरुणासोबत घडला आहे. या तरुणाने सोशल मीडियावर आपला भयानक अनुभव शेअर केला आहे. या तरुणाने घरच्या घरी केसांना कलर केलं, पण यानंतर त्याची जी अवस्थी झाली तो त्याने फोटोच्या माध्यमातून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) शेअर केला आहे. तरुणाचे हे फोटो पाहून लोकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

केमिकलमुळे चेहऱ्यावर परिणाम
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत हा तरुण सुरुवातीला आपले केस रंगावताना दिसत आहे. पण त्यानंतर तरुणाबरोबर जे झालं ते पाहून धक्का बसेल. त्या तरुणाने केसांना कलर केल्यानंतर पुढच्या काही दिवासात नेमकं काय-काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  केसांना कलर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाच्या चेहऱ्याची अवस्था बिकट झालेली असून चेहरा पूर्ण सुजलेला दिसत आहे. तिसऱ्या दिवशी तर त्याचा चेहरा पूर्ण सुजलेला होता आणि त्याचे डोळे उघडत नव्हते. त्यानंतर मात्र त्याने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

डॉक्टरांनी त्या तरुणावर तात्काळ उपचार सुरु केलं. संपूर्ण  एक दिवस त्या तरुणाला रुग्णालायत राहावं लागलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारा मिळणाऱ्या रेडिमेड हेअर कलरमध्ये काही रसायनं मिसळली जातात. यातल्या PPD नावाच्या रसायनाची या तरुणाला एलर्जी होती. त्या रसायनामुळे सचिनचा शरिरवार परिणाम झाल झाले आणि त्याचा चेहरा सुजला. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर पूर्ण बरं होण्यासाठी त्या तरुणाला आठवडाभराचा कालावधी लागला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by WIZ HUMOR (@wizhumor)

पाकिटावर असतो इशारा
तुम्ही सुध्दा बाजारात  मिळणारा हेअर कलर प्रोडक्ट वापरत असाल तर एक गोष्टी नक्की पाहा. पाकिटावर इशार दिलेला असतो. केसांना कलर करण्यापूर्वी आपल्या शरीराला ते हानीकारक आहे की नाही हे तपासून घ्या. यासाठी हातावर चाचणी कर आणि परिणाम होत नसेल तरच वापरा, असा इशारा दिलेला असतो. पण बरेचदा आपण हा इशारा न वाचतात प्रोडक्ट्स वापरतो. त्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोकांनी यावरुन विचार करण्याची गरज आहे.