गावातल्या जमिनीत हिऱ्यांची खाण, प्रत्येक घर होणार करोडपती?

हजारो लोकांनी या ठिकाणी हिरे मिळेल या आशेने खोदकाम सुरु केले.

Updated: Jun 16, 2021, 07:17 PM IST
गावातल्या जमिनीत हिऱ्यांची खाण, प्रत्येक घर होणार करोडपती? title=

केपटाउन : एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतील एका गावात काही विशिष्ट दगड सापडल्यानंतर मोठ्या संख्येने लोकं येथे जमले आहेत. हिरे मिळतील या आशेने लोकं नशीब आजमावण्यासाठी दूरवरुन येथे येत आहेत.  KwaHlathi क्वा-झुलु-नटाल गावात हजारो लोकं खोदकामात गुंतले आहेत. 

दक्षिण आफ्रिकेतील क्वा-झुलु-नटाल भागात शेकडो लोकं हिरे शोधण्यासाठी खोदकाम करत आहेत.. या भागात सापडणा-या विशिष्ट प्रकराच्या दगडांसाठी ही धडपड सुरु आहे. हे दगड हिरे असल्याचं मेंडो सबेलो नावाच्या एका व्यक्तीनं सांगीतलं त्यानंर ही डायमंड रश सुरु झालीये. मिळेल त्या साधनानं नागरिक इथं खोदकाम करुन हे दगड घेऊन जात आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासनानं नागरिकांना इथं येण्यास बंदी घातलीये.

स्काय न्यूजच्या वृत्तानुसार मेंडो सबेलो नावाच्या व्यक्तीने या शोधाला जीवन बदलणारे म्हटले आहे. तो म्हणतो की आता त्याला छोटी कामे करावी लागणार नाहीत आणि त्याचे आयुष्य बदलू शकेल. त्याच्यासारखे बरेच लोक आहेत जे हिरे  मिळण्याच्या आशेने येथे खोदकाम करत आहेत.

देशातील खनिज संसाधन विभागाने असे म्हटले आहे की, भूगर्भशास्त्र आणि उत्खनन तज्ञांचे एक पथक येथे पाठवले जाईल जे नमुने गोळा करतील आणि त्याचे विश्लेषण करतील. यासंदर्भात औपचारिक अहवाल सादर केला जाईल. हे दगड प्रत्यक्षात हिरे आहेत की नाही हे अद्याप माहित नसले तरी लोक खोदण्यात व्यस्त आहेत.

अगदी बर्‍याच लोकांनी त्यांची विक्री सुरू केली आहे. प्रांतीय सरकारने लोकांना ही जागा रिकामी करण्यास सांगितले आहे, जेणेकरून योग्य तपासणी करता येईल. इतक्या मोठ्या संख्येने लोकं जमा झाल्यामुळे कोरोचा प्रसार होण्याचा धोका देखील आहे. कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.