कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 3, 2017, 05:39 PM IST
कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक  title=

लंडन : भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.

ईडीनं लंडनच्या कोर्टामध्ये प्रमाणपत्र सादर केल्यानंतर माल्ल्याला अटक करण्यात आली. मल्ल्यानं बँकांकडून घेतलेलं कर्ज टॅक्स हेवनमध्ये फिरवल्याचं ईडीनं लंडन कोर्टाला सांगितलं. सीबीआय आणि ईडीच्या माल्ल्याविरुद्धच्या केस एकत्र चालवण्यात येणार आहेत. विजय माल्ल्यानं भारतीय बँकांचं तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवलं. यानंतर तो लंडनला पळून गेला. 

माल्ल्यानं बुडवली या बँकांची कर्ज 

बँकेचे नाव              कर्जाची रक्कम (दशलक्ष)
एसबीआय                      1600
आयडीबीआय                   800
पीएनबी                          800
बँक ऑफ इंडिया                650 
बँक ऑफ बडोदा                550 
युनायटेड बँक ऑफ इंडिया    430 
मध्यवर्ती बँक                   410
युकॉन बँक                       320
कॉर्पोरेशन बँक                   310
स्टेट बँक ऑफ म्हैसूर          150
इंडियन ओव्हरसीज बँक       140
फेडरल बँक                        90
पंजाब अँड सिंध बँक             60
अॅक्सिस बँक                      50
इतर बँका                         603 
एकूण                              6963 कोटी