Crime News: सोशल मीडियावर (Social media) एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) समोर आला आहे. गाडीत बसून बर्गर (Burger) खाणाऱ्या तरुणावर पोलिसांनी अचानक गोळीबार केला. ही भयानक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (US Police fired bullets at a young man eating a burger in a car nmp)
हेल्थकेअर अॅडव्होकेट (Healthcare Advocate) आणि सोशल मीडिया प्रभावक केंडल ब्राउन यांनी ट्विट (Tweet) करून या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. झी न्यूज या व्हिडिओची कुठलीही पुष्टता देत नाही. रिपोर्टनुसार, ही घटना 2 ऑक्टोबरला अमेरिकेतील सॅन अँटोनियो (San Antonio, USA) भागात एका फास्ट फूड रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये घडली. पोलीस शिपाई जेम्स ब्रेनँड (James Brainand) मार्केटबाहेर गस्त घालत होते. पार्किंगमध्ये एक कार उभी असलेली दिसली. पोलीस शिपाईने कारचे दार ठोठावले आणि उघडले तर आत स्टिअरिंग सीटवर एक मुलगा बर्गर खात होता.
पोलिसाने त्या मुलाला बाहेर यायला सांगितले. मुलाने कारण विचारले असता पोलिसाने त्याच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मुलगा घाबरला आणि त्याने भरधाव वेगाने कार पळवली. या घटनेत एरिक कांटू (Erik Cantu) हा 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Earlier this week, a San Antonio cop abruptly confronted a teen eating in a McDonalds parking lot & demanded the teen exit his vehicle.
When the teen asked why, the cop immediately assaulted & then shot him MULTIPLE TIMES. Cop tried to (falsely) claim the teen had struck him 1st pic.twitter.com/ATNKj4fVgi
— Kendall Brown (@kendallybrown) October 7, 2022
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शहर पोलीस प्रमुख विल्यम मॅकमॅनस (William McManus) म्हणाले की, ते गोळीबाराचे समर्थन करू शकत नाहीत. त्याचवेळी जिल्हा वकील जो गोन्झालेस म्हणाले की, नि:शस्त्र मुलावर गोळी झाडल्याप्रकरणी आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार मुलाचा कोणताही दोष नाही.