जगातील सर्वात उंच बुर्ज खलीफाच्या टोकावरुन कसा दिसतो नजारा? पहिल्यांदाच Video समोर

Burj Khalifa Viral Video : जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईमधल्या बुर्ज खलीफा इमारतीची गणना होते. आता पर्यंत बुर्ज खलीफाचे अनेक फोटो, व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण बुर्ज खलीफाच्या शेवटच्या मजल्यावरुन खालचा नजारा कसा दिसतो याचा पहिल्यांदाच व्हिडिओ समोर आला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 7, 2024, 08:12 PM IST
जगातील सर्वात उंच बुर्ज खलीफाच्या टोकावरुन कसा दिसतो नजारा? पहिल्यांदाच Video समोर title=

Burj Khalifa Viral Video : जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईमधल्या बुर्ज खलीफा (Burj Khalifa) इमारतीची गणना होते. आता पर्यंत बुर्ज खलीफाचे अनेक फोटो, व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण बुर्ज खलीफाच्या शेवटच्या मजल्यावरुन खालचा नजारा कसा दिसतो याचा पहिल्यांदाच व्हिडिओ समोर आला आहे. मोहम्मद आकिब नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर (Instagram) याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकं थक्क झाली आहेत. जगाच्या नजरेत ही इमारत तिची अनोखी रचना आणि अप्रतिम डिझाइनसाठी ओळखली जाते. दुबईला गेल्यावर बुर्ज खलीफा इमारत पाहण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. दुबईला (Dubai) न गेलेल्या लोकांनी बुर्ज खलिफाची उंची आणि तिची भव्यता फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली असेल. 

बुर्ज खलीफा इमारतीवरुन कसं दिसतो नजारा?
बुर्ज खलीफा ही जगातील सर्वात उंच इमारत असल्याचं सांगितलं जातं. या इमारतीची उंची 828 मीटर म्हणजे तब्बल 2,717 फूट इतकी आहे. बुर्ज खलीफा इमारतीला 163 मजले आहेत. जमिनीवरुन बुर्ज खलीफा इमारतीचे फोटो किंवा व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील. पण विचार करा जगातील या सर्वात उंच इमारतीवरुन खालचा नजारा कसा दिसत असेल. पहिल्यांदाच बुर्ज खलीफा इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरुन टिपलेलं दृष्य सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात आलं आहे. 

अद्भूत नजारा
मोहम्मद आकिब यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही अद्भूत दृश्य शेअर केली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायर  झाला असून अद्भूत आणि अविश्वसनीय अशा प्रतिक्रिया युजर्सने दिल्यात. आपण कल्पनाही करु शकत नाही अशी मनमोहक दृश्य आहेत. या व्हिडिओत पांढऱ्या ढगांची चादर पसरलेली भासत आहे. जिथे नजर जाईल तिथे केवळ पांढरेशुभ्र ढग दिसतायत. बुर्ज खलीफा इमारतीचे वरचे काही मजले अक्षरश: ढगांवर तरंगत असल्याचा भास या व्हिडिओतून होतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by md Akib (@mdakib8879)

या व्हिडिओच्या सुरुवातीला बालकनीचा दरवाजा उघडताना दिसत आहे, त्यानंतर कॅमेरा खालच्या बाजूला फिरवण्यात आला आहे. यात चारी बाजूला केवळ ढग दिसतायत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ आतापर्यंत 32 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओला लाइक आणि शेअर केलंय. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. 

एका युजरने म्हटलंय, बुर्ज खलीफाच्या वरच्या मजल्यावर पावसाचा परिणामही होत नसेल. कारण सर्व ढग खाली आहेत.