Trending Video : नुकतेच एअर इंडियाच्या (Air India News) विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याची घटना चर्चेत आहे. जिथे एका सहप्रवाशाने तिच्यावर लघवी केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. या आरोपीला पोलिसांनी बंगरुळुमधून अटक करण्यात आली आहे. अशातच विमानातील अजून एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशाने पायलटशी हाणामारी
(passengers fighting) केली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडिओमध्ये पायलटशी हुज्जत घालत असणारा प्रवासी इतर सहप्रवाशाशी वारंवार गैरवर्तन करत होता. एवढंच नाही तर त्याने विमानातील क्रू मेंबर्सशीही वाद घातला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तो व्यक्ती विमानात सगळ्यांशी वाद घालताना दिसतं आहे. हा वाद तेव्हा जास्त चिघळला जेव्हा या प्रवाशाने पायलटचा शर्ट पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. (Trending Video passenger fights with a pilot on australian flight viral on Social media)
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बेशिस्त आणि निर्लज प्रवाशाला विमानातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. तरीदेखील तो प्रवासी ऐकत नव्हतं. तेव्हा विमानातील क्रू मेंबर्सला त्याला विमानातून बाहेर ढकल्यावे लागले. एवढंच नाही तर त्याच्यावर प्रवास निर्बंध लादण्यात आल्याचंही एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियन (World news) विमानात ही घटना घडली. टाऊन्सविले-सिडनी (Townsville Airport) फ्लाइटममध्ये हा व्हिडिओ आहे. जेव्हा हे विमान टाऊन्सविले विमानतळावर उभे असताना हा सगळ्या प्रकार घडला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) FlightMode या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
An unruly passenger was kicked out from the aircraft by Virgin Australia's pilot on flight between Townsville to Sydney.
©Ben Mckay/TikTok#VirginAustralia #Australia #aviation #AvGeek #avgeeks #flights #Travel #traveler #pilotlife #pilot pic.twitter.com/vBtbmV7tKe
— FlightMode (@FlightModeblog) January 5, 2023
दरम्यान ही प्रकरण पोलिसांकडे गेलं असल्याचं एअरलाइनकडून सांगण्यात आलं आहे. विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही एअरलाइनची आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइटमध्ये कोणत्याही प्रकारचे अनियंत्रित वर्तन सहन केले जाणार नाही असं एअरलाइनकडून सांगण्यात आलं आहे.