VIDEO : प्रायव्हेट पार्ट दाबण्याचा प्रयत्न, भरमैदानात फुटबॉलपटूचे लज्जास्पद कृत्य

Viral Video : फुटबॉलच्या मैदानात अनेक वेळा आपण खेळाडूंचे अनेक वाद पाहिले आहेत. अगदी मैदानातील भांडण मारामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण एका फुटबॉलपटूने तर हद्दच केली आहे. 

Updated: Jan 13, 2023, 09:33 AM IST
VIDEO : प्रायव्हेट पार्ट दाबण्याचा प्रयत्न, भरमैदानात फुटबॉलपटूचे लज्जास्पद कृत्य title=
trending video football player touch private part of another player La Liga Atletico vs Barcelona viral on Social media marathi news

Football Viral Video :  फुटबॉल मैदानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होतं असतात. मैदानात खेळाडू एकमेकांशी भिडतात, वाद (Football Fight Video) होतात अगदी त्यांच्यामध्ये मारामारी पण होते. यांचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. अनेक वेळा खेळामध्ये फुटबॉलपटू चुकीचे टॅकल करतात. अशी वेळी समोरचा खेळाडू (player) जखमी होतो. अशा परिस्थिती रेफरी त्यांना पिवळं कार्ड (Yellow card) आणि अगदीच न केल्यास लाल कार्ड (Red card) दाखवतं मैदानाबाहेरचा रस्ता दाखवतात. पण सध्या सोशल मीडियावर एका फुटबॉलपटूचं धक्कादायक (Shocking) कृत्य समोर आलं आहे. 

लज्जास्पद कृत्य

ला लीगचा एका अॅटलेटिका विरुद्ध बार्सिलोना यांच्यातील सामान्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सामना बार्सिलोनाने 1-0 असा जिंकला पण त्यातील एका खेळाडूच्या कृत्याने जगाचे लक्ष वेधून घेतले. हा सामना संपल्यानंतर दोन खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. झालं असं की, सामन्याच्या 92 व्या मिनिटाला फेरान टोरेस आणि स्टीफन सॅविक जमिनीवर आदळले. पण उठण्याचा प्रयत्न करत असताना सॅविकने फेरान टोरेसच्या प्रायव्हेट पार्टला दाबलं, ज्यामुळे त्याला दुखापत झाली. ( trending video football player touch private part of another player La Liga Atletico vs Barcelona viral on Social media marathi news)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ESPN FC (@espnfc)

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लाखोच्या संख्येत त्याला व्ह्यूज मिळाले आहेत. खेळाडूच्या अशा कृत्यामुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली आहे. अनेकांनी खेळाडूच्या अशा कृत्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. खेळाच्या मैदानात अनेक वाद आणि भांडण आपण पाहिली आहेत. पण असं कृत्य हे खेळ जगतात धक्कादायक आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर espnfc या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.