Trending News: भारताचा शेजारी देश चीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चीन म्हटलं तर कोरोनाचं महासंकटाची आठवण होतं. मात्र यंदा चीन हा एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेचा विषय बनला आहे. माणूस हा समुद्र आणि अंतराळावर पोहचला. खोल महासागरातील अनेक रहस्यमय गुपित माणसांनी शोधून काढली आहेत. पण या विशाल पृथ्वीवर अनेक अशा रहस्यमय जागा आहे जिथे माणूस अजून पोहोचू शकला नाही आहे. चीनमध्येही अशाच एका जागेचा शोध लागला आहे.
पृथ्वीवर 71 टक्के पाणी आणि बाकी भागात जमीन आहे. पृथ्वीतलावर असे अनेक भाग आहेत जिथे माणूस पोहोचू शकला नाही आहे. आता आपण हायटेक झालो आहेत. त्यामुळे आपण अनेक अशा रहस्यमय जागांचा शोध घेत आहोत. चीनमध्येही अशी एक गुप्त जागा आहे. तिथे आजपर्यंत कोणीही जाऊ शकलेलं नाही.
चीनमध्ये लेये काउंटी इथे विशाल असं जगंलाचं साम्राज्य पसरलं आहे. तिथे एका विशाल गुहेचा शोध घेण्यात आला आहे. पहिल्यांदा या गुहेत माणसाने पाऊल ठेवलं आहे. या विशाल गुहेचा कुठेही अंत नाही, असं इथले स्थानिक लोकं म्हणतात. या विशाल गुहेला स्थानिक लोकं 'शेनयिंग तिआंकेंग' असं संबोधतात. तर शोधकर्त्यांनी याला 'दुसरं जग' असं म्हटलं आहे. या दुसऱ्या जगात शोधकर्त्यांना अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घनदाट जंगलातील ही गुहा 630 फूट विशाल असून 490 फूट अरुंद आहे. तर शोधकर्त्यांना या गुहेत जाण्यासाठी 3 रस्ते मिळाले. या गुह्यात 130 फूट उंच अशी झाडं पण आहेत. ही झाडं प्रवेशद्वाराकडे झुकली आहेत. त्यामुळे या गुह्यात सुर्यकिरण पोहोचत नाही. मात्र गुहेच्या आतून बाहेरील दृष्य अगदी मन मोहून टाकतं.
या गुह्येमध्ये अनेक रहस्यमय गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र शोधकर्त्यांना कुठलीही संशयास्पद गोष्ट सापडलेली नाही. या गुह्यात जवळपास 30 खड्डे सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते, पाण्याच्या जोर प्रवाहामुळे अशाप्रकारे खड्डे निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र अजून हे खड्डे कसे निर्माण झाले हे सिद्ध झालेलं नाही. यासोबत या गुहेत अनेक नवीन प्रजातीचे झाडे आणि वनस्पती सापडली आहे.