कार सुरू ठेवली आणि घात झाला! अपघाताचा थरारक Video व्हायरल

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल (viral) होतो आहे. कारचा (Car) विचित्र दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कारसमोर जाण्याची तुमची हिंमत होणार नाही...

Updated: Sep 14, 2022, 03:48 PM IST
 कार सुरू ठेवली आणि घात झाला! अपघाताचा थरारक  Video व्हायरल title=
Treading Video horrible car accident Video viral on social media nm

Car Accident : सोशल मीडियावर (social media) आपण अनेक धक्कादायक आणि थरारक असे अपघाताचे व्हिडीओ (Video) पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल (viral) होतो आहे. कारचा (Car) विचित्र दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कारसमोर जाण्याची तुमची हिंमत होणार नाही...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका बंद दुकानासमोर कार उभी आहे. एक व्यक्ती कारची दुरुस्ती (Car repair) करतो आहे. तिथे दोन महिला पण आहेत. एका महिलेजवळ लहान मुलं देखील आहे. (Treading Video horrible car accident Video viral on social media nm)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कार सुरू ठेवून हा चालक कार दुरूस्त करत होता...कारचं बोनेट उघडून कारमध्ये झालेला बिघाड पाहात होता...यावेळी अचानक ही कार सुरू झाली...आणि ही व्यक्ती कारनं चिरडली आणि दुकानाच्या शटरमध्ये अडकून पडला. 

या कारचालकाच्या कधी स्वप्नातही आलं नसेल की आपली कारच आपल्या अंगावर येईल ..पण, छोटीशी चूक या कारचालकाला (driver) महागात पडली...झालेल्या घटनेनंतर एकच आरडाओरड झाली...पण, इथे असलेल्यांना कार चालवता येत नसल्याने त्या व्यक्तीला बाहेर काढणंही अवघड झालं...

अखेर शटर उघडून या व्यक्तीला बाहेर काढलं...पण, या अपघातात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला...हा व्हिडिओ परदेशातील असून या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय...जर तुम्ही गाडी सुरू ठेवून काम करत असाल तर काळजी घ्या...किंवा हॅन्डब्रेक (Handbrake) लावायला विसरू नका..