जीव वाचवण्यासाठी पोलीस कारच्या बोनेटवर चढला

जीव वाचवण्यासाठी काय काय करावं लागतं, प्रसंगावधान राखलं तर जीवही वाचतो, असं म्हणायला काही हरकत नाही.

Updated: Sep 10, 2017, 05:48 PM IST

बीजिंग : जीव वाचवण्यासाठी काय काय करावं लागतं, प्रसंगावधान राखलं तर जीवही वाचतो, असं म्हणायला काही हरकत नाही, कारण चीनमधील डालियान येथील एका तपासणी नाक्यावर पोलिसांनी एका कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुजोर कारचालक त्यांना न जुमानता पुढे गेला. कार अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने कार पोलिसाच्या अंगावर घातली. 

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर चढला. आपला मुजोरपणा वाहतूक पोलिसाच्या जीवावर बेतू शकतो, याची पर्वाही चालकाने केली नाही. उलट त्याने कार दोन किलोमीटरपर्यंत पळवली. हा जीवघेणा प्रसंग रस्त्याच्या आजूबाजूला असलेले लोक पाहत होते. त्या पोलिसाला वाचवण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. 

एकाने धाडसाने केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यात भरधाव कारच्या बोनेटवर वाहतूक पोलीस असून कारचा एक दरवाजा उघडा असल्याचे दिसत आहे. दोन किलोमीटरपर्यंत कार धावल्यानंतर तिला थांबवण्यात अखेर लोकांना यश आलं.