कांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या दरात वाढ, गाठला 400 रुपयांचा आकडा

टोमॅटोच्या दर गगनाला भिडणे 

Updated: Nov 21, 2019, 11:01 AM IST
कांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या दरात वाढ, गाठला 400 रुपयांचा आकडा  title=

कराची : महागाई तर दिवसेंदिवस आपलाच रेकॉर्ड तोडत आहे. दररोजच्या वापरातल्या गोष्टींच्या दरांनी उंची गाठली आहे. कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोचे दर देखील वाढले आहेत. कांद्याने भारतात 100 रुपयांचा आकडा गाठला होता तर बांग्लादेशमध्ये 270 रुपयांना कांदा विकला जात होता. असं असताना आता टोमॅटो 400 रुपये किलोने पाकिस्तानात विकला जात आहे. 

पाकिस्तानात भाज्यांचे आणि टोमॅटोचे दर वाढले आहेत. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी पाकिस्तान सरकारने इराणमधून टोमॅटो आयात केले पण इराणी टोमॅटो बाजारात पोहोचू न शकल्यामुळे बाजारात 400 रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. 

'डॉन' ने दिलेल्या माहितीनुसार, कराचीत सोमवारी टोमॅटो 300 रुपये किलोने विकला गेला. मंगळवारी हा दर वाढून 400 रुपयांवर पोहोचला. सरकारने इराणमधून चार हजार टन टोमॅटो आयात करण्यासाठी परमिट जाहिर केलं आहे मात्र 989टनच टोमॅटो पाकिस्तानात पोहोचला आहे. 

बुधवारी सोशल मीडियावर पाकिस्तानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एका वधुने चक्क टोमॅटोचे दागिने परिधान केले होते. याबाबत त्या वधुला विचारणा केली असता तिचं उत्तर आश्चर्यकारक आहे. आपल्याला माहितच आहे सोन्याचे दर वाढले आहेत त्यातच आता टोमॅटोच्या दरांनी देखील उंची गाठली आहे. यामुळे या वधुने टोमॅटोचे दागिने घातले होते. 

वाढत्या महागाईमुळे सोशल मीडियावर Memes बनायला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर याचा ट्रेंड पाहायला मिळतो.