मुंबई : कोरोना महामारीचं जगासमोर संकट असताना आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचने ताबा मिळवल्यामुळे अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका आणखी वाढला आहे. दुसरीकडे पोलिओ विषाणूचा प्रसार होण्याचीही शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओ विषयी तज्ज्ञ समितीने सदस्य देशांना इशारा दिली आहे की, अफगाणिस्तानमधील गृहयुद्धासारख्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिओ विषाणू पसरण्याचा धोका पुन्हा वाढला आहे.
इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन, 2005 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आणीबाणी समितीने आपल्या 29 व्या बैठकीनंतर म्हटले की, पोलिओच्या प्रतिबंधासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, पण त्याबद्दल संतुष्ट होण्याची वेळ नाही.
"वाढत्या लष्करी संघर्षामुळे, अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये सुरू असलेल्या दुर्गमतेमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे," असे समितीने बैठकीदरम्यान सांगितले. एकट्या दक्षिण अफगाणिस्तानात, सुमारे दहा लाख मुलांना गेल्या तीन वर्षांपासून लस मिळालेली नाही. लसीकरण न झालेल्या मुलांची संख्या वाढत आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे जगातील दोनच देश आहेत जिथे पोलिओ आहे. लसीकरणाच्या प्रयत्नांना 2018 पासून अडचणी आल्या आहेत कारण त्यांनी तालिबान मजबूत असलेल्या भागात घरोघरी जाऊन लसीकरणावर बंदी
अफगाणिस्तानमध्ये पोलिओचा धोका ओळखून आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आधीच जाहीर केले आहे की, तेथून परतणाऱ्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून पोलिओचे लसीकरण केले जाईल.
"आम्ही अफगाणिस्तानातून परतणाऱ्या लोकांना पोलिओ विषाणूपासून सावधगिरी म्हणून मोफत पोलिओविरोधी लस - OPV आणि FIPV देण्याचा निर्णय घेतला आहे," मांडवीया यांनी ट्विट केले. सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांनी आरोग्य पथकाचे अभिनंदन केले.