युनायटेड किंगडम : काही लोकांचे छंद इतके विचित्र असतात की, त्याबद्दल ऐकून कोणीही डोक्याला हात लावतील. पण छंद हा छंद असतो. एवढंच नाही काहीजणं आपला छंद पूर्ण करण्यासाठी करोडो रुपये खर्च करतात. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याचे छंद ऐकून तुम्ही नक्कीच दंग व्हाल. कारण या व्यक्तीला स्मशानात जाऊन थडग्यांसोबत फोटो काढण्याची आवड आहे. याहूनही c
मार्क डबास नावाच्या व्यक्तीला एक विचित्र छंद आहे. तो जगातील प्रसिद्ध लोकांच्या कबरीवर जातो आणि त्याठिकाणी फोटो काढतो. आश्चर्याची बाब म्हणजे हे करण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यासाठी मागे हटत नाही. आतापर्यंत त्याने जगभरात फिरून 700 स्मशानभूमीत फोटो काढलेत. जगातून निघून गेलेल्या या लोकांना भेटायला तो तिथे जातो, असं तो सांगतो.
49 वर्षीय मार्क डबास यांना एक अनोखा छंद आहे, ज्यामुळे तो जगातील विविध ठिकाणी फिरतो आणि लोकांच्या थडग्यांना भेट देतो. जिथे ते ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक व्यक्तींच्या कबरींना भेट देतो आणि फोटो काढतो. त्याने वॉशिंग्टन डीसीमधील जॉन एफ केनेडी आणि लॉस एंजेलिसमधील मर्लिन मनरो यांच्या थडग्यांनाही भेट दिली आहे.
त्याने आतापर्यंत 700 कबरींसोबत फोटो काढले आहेत. त्यापैकी 100 फक्त युनायटेड किंगडममध्ये आहेत. त्याला क्रीडा, राजकारण, चित्रपट आणि इतिहासाशी निगडित लोकांच्या कबरींना भेट द्यायला आवडतं आणि तो सध्या या छंदावर नियंत्रण ठेवण्याच्या मनस्थितीत नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मार्क डबासने कबरींसोबत फोटो काढण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत $160,000 पेक्षा जास्त म्हणजेच 1 कोटी 24 लाख रुपये खर्च केले आहेत.