कोरोना प्रोटोकॉलमुळे पंतप्रधानांचा खासगी आयुष्याबाबत मोठा निर्णय

एका लग्नानंतर ओमायक्रॉनची 9 प्रकरणं नोंदवली गेली. तेव्हापासून या ठिकाणी कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे

Updated: Jan 23, 2022, 03:27 PM IST
कोरोना प्रोटोकॉलमुळे पंतप्रधानांचा खासगी आयुष्याबाबत मोठा निर्णय title=

न्यूझीलंड : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे त्यांनी त्यांचं लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी त्या म्हणाल्या, देशातील वाढत्या ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे लग्न रद्द करण्यात आलं आहे.

न्यूझीलंडमध्ये रविवारी रात्रीपासून मास्क अनिवार्य करण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय जमावबंदी बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला केवळ मर्यादित लोकंच उपस्थित राहू शकतील.

New Zealand Prime Minister Jacinda Ardern sets September 19 as election  date | World News | Zee News

न्यूझीलंडमध्ये झालेल्या एका लग्नानंतर ओमायक्रॉनची 9 प्रकरणं नोंदवली गेली. तेव्हापासून या ठिकाणी कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे. एक कुटुंब ऑकलंडहून लग्न समारंभात सहभागी होऊन विमानाने दक्षिण आइसलँडला परतलं होतं. यानंतर कुटुंबातील सदस्य आणि फ्लाइट अटेंडंटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शिवाय कुटुंबातील सदस्य आणि फ्लाइट अटेंडंटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  

न्यूझीलंडमध्ये कडक निर्बंध

नवीन निर्बंधांनुसार, बार, रेस्टॉरंट्स आणि लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना परवानगी आहे. याशिवाय कार्यक्रमस्थळी वॅक्सिन पास नसल्यास केवळ २५ लोकंच उपस्थित राहू शकतात.

आर्डर्न 2017 मध्ये न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची पुन्हा आली. त्यांनी आपल्या लेबर पार्टीला अर्ध्या शतकातील सर्वात मोठा निवडणूक विजय मिळवून दिला. जॅसिंडा आर्डर्न तिचा मित्र क्लार्क गेफोर्डसोबत लग्न करणार आहे. 40 वर्षीय पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्नने 2019 मध्ये तिचा प्रियकर आणि टीव्ही होस्ट गेफोर्डशी साखरपुडा केला होता.