नवी दिल्ली : थायलंडमध्ये एका गुहेत अडकलेल्या 12 मुलं आणि त्यांच्या फुटबॉल कोचचला बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. 13 इंटरनॅशनल आणि 5 थाय नेव्ही सीलचे पाणबुडे पाठवण्यात आले आहेत. हे संपूर्ण ऑपरेशन सुरु असताना एका मुलाला 2 पाणबुड्यांसोबत बाहेर आणलं जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका मुलाला बाहेर आणण्यासाठी 11 तास लागतील. सगळी मुलं एकसोबत बाहेर नाही आणली जाऊ शकतय हे संपूर्ण ऑपरेशन 4 दिवस चालले अशी शक्यता आहे.
शनिवारी गुहेमध्ये पाणी सगळ्यात कमी स्तरावर जाऊन पोहोचले. यानंतर अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला होता की मुलांनी बाहेर काढण्यासाठी ही योग्य वेळ आहे. अधिकाऱ्यांच्या मते गुहेमध्ये पायी चालले जाऊ शकते. मोटर पंपच्या साहय्याने हजारो लीटर पाणी गुहेतून बाहेर काढलं आहे.
थायलंडचे पाणबुडे या मिशनचे नेतृत्व करतील. परराष्ट्राचे पाणबुडे ऑक्सीजन टँक घेऊन पोहोचतील. या मोहिमेत आस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि यूरोपसह अन्य देशांचे आणखी काही पाणबुडे देखील सहभागी आहेत.
थायलंड नौदलाचे प्रमुख रिअर अॅडमिरल एफाकोर्न यू कोंगकेउ यांनी म्हटलं की, गुहेमध्ये ऑक्सीजनचं प्रमाण 15 टक्के कमी झालं होतं. ज्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ शकली असती. त्यानंतर ऑक्सीजनचा पाईप गुहेमध्ये सोडण्यात आला आहे.
गव्हर्नर यांनी म्हटलं की, सुरक्षारक्षक या अभियानाला यशस्वी करतील पण त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेतली आईल. थायलंडच्या अंडर 16 फुटबॉलची ही टीम त्यांच्या 25 वर्षीय कोचसह 23 जूनपासून गुहेत अडकले आहेत.