Halloween : दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये एक वेदनादायक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. एएनआयने योनहाप या वृत्तसंस्थेचा हवाला देत दक्षिण कोरियामध्ये हॅलोविन चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 151 वर पोहोचल्याचे म्हटलंं आहे. ज्यामध्ये 150 लोक जखमी झाले आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये खचाखच भरलेल्या हॅलोवीन पार्टीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पार्टीवेळी गोंधळ झाला आणि यावेळी झालेल्या गर्दीमध्ये 50 जणांना हार्ट अटॅक आल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळीच अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
योंसान-गु जिल्ह्यातल्या इटावनमध्ये हेलोविन फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिव्हलसाठी शेकडो लोक जमले होते. अचानक याठिकाणी गोंधळ झाला. गर्दीमुळे लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. यातील अनेकांना हृदयविकाराचा झटका आला.
या हॅलोविन पार्टीला एक लाखाहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाच्या राजधानीच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमध्ये हॅलोविन साजरे करण्यासाठी प्रचंड गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोविड-19 निर्बंध शिथिल केल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा मेळावा म्हणून सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करणारे किमान 81 कॉल आले.
आम्ही तुम्हाला सांगतो की हॅलोविन सण जगातील अनेक शहरांमध्ये साजरा केला जातो. विशेषतः हे सण पाश्चात्य देश साजरे करतात. पण आता तो जगाच्या इतर भागातही साजरा केला जात आहे. या उत्सवादरम्यान रात्री चंद्र नवीन अवतारात दिसतो.