नवी दिल्ली : ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत तो ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागात अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आहे या कारवाईत हमजाचा खात्मा करण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रक व्हाइट हाऊसच्या वतीनं जारी करण्यात आल आहे.
काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्क मधील ९-११ च्या हल्ल्याला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे लादेनच्या खात्म्यानंतर अल कायदा विरोधात ही मोठी कारवाई मानली जाते आहे.
मार्च २०१९ मध्ये अमेरिकेनं हमजा बिन लादेनची माहिती सांगणाऱ्यास १० लाख डॉलर एवढं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. याआधी १ ऑगस्टला देखील ही माहिती समोर आली होती. पण त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील यावर काहीही माहिती दिली नव्हती.