Brother Sister Marriage : काय म्हणावं याला! भावाने बहिणीसोबतच उरकलं लग्न?

Viral News : समाजातील नातेसंबंधाची परिभाषा बदलत चाली आहे. नातेसंबंधांना मार्डन युगात तडा जाताना दिसत आहे. सून आणि सासऱ्यांचं लग्न, वडील आणि मुलीचं लग्न आणि आता हे काय बहीण भावाचं लग्न...

Updated: May 19, 2023, 03:56 PM IST
Brother Sister Marriage : काय म्हणावं याला! भावाने बहिणीसोबतच उरकलं लग्न? title=
Sister fell in love with brother and got Married Viral trending News on Social media

Brother Sister Marriage : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात...वडील आणि मुलीच्या नात्यानंतर जर कुठलं नातं हे पवित्र असेल तर ते बहीण भावाचं. मोठी बहीण ही लहान भावड्यांसाठी मायची सावली असते. तर मोठा भाऊ म्हणजे वडिलाची छाया...पण आजकाल प्रेमाची परीभाषाचं बदलली आहे. आज सून सासरे, वडील मुलगी आणि आता बहीण भाऊ यांचा लग्नाचे (Marriage news) प्रकरण समोर येतं आहेत. 

हा तर नातेसंबंधांना धक्का!

आज पती पत्नी म्हणून जगत असलेले हे दोघे लग्नापूर्वी भाऊ बहीण होते. ही विचित्र लव्ह स्टोरी ऐकाना अवाक् करत आहेत. झालं असं की, एकदा त्या महिलेचा चुलत भाऊ तिच्या घरी आला. वडिलांनी दोघांची ओळख करुन दिली. मुलगी पाहता क्षणीच त्या व्यक्तीच्या म्हणजेच भावाच्या प्रेमातच पडली. (brother sister relationship)

30 वर्षाची वधू अन् 60 वर्षांचा वर

जेव्हा बहीण तिच्या भावाला भेटली तेव्हा ती 30 वर्षाची होती तर भाऊ हा 60 वर्षांचा होता. आज काल लग्न करताना रंग, जात आणि वय देखील पाहिलं जातं नाही. या दोघांमध्ये तब्बल 29 वर्षांचे अंतर आहे. चार दिवसाच्या भेटीमध्ये या बहीण भावाच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. या दोघांनी 3 महिन्यातच लग्नाचा निर्णय घेतला.

आज त्यांचा लग्नाला 6 वर्षे झाली आहेत. (Sister fell in love with brother and got Married Viral trending News on Social media)

हेसुद्धा वाचा - Father Daughter Affair : नवऱ्याला धोका देत तिने वडिलांशी ठेवले शारीरिक संबंध, मुलांनाही दिला जन्म

समाजातून टोमणे ऐकावे लागतात!

हे कपल आहे ब्राझीलमधील...तिथे आजही त्या मुलीला समाजातून टोमणे ऐकावे लागतात.

अनेकांनी तिला सांगितलं त्या माणसाने तुझ्याशी पैशांसाठी लग्न केलं आहे. पण ती कोणाचंही ऐकत नाही. या महिलेचं नाव हे डेबोरा (Debora Peixoto) असून तिच्या पतीचं अँडरसन (Anderson Alves Peixoto) आहे.  प्रेमावर कोणाचाच जोर चालत नाही या दोघांनी सिद्ध केलं.  या दोघांनी प्रेम आणि लग्नासाठी कोणाची अगदी समाजाचीही पर्वा केली नाही. प्रेमात माणूस प्रत्येक आव्हानावर मात करण्यास तयार असतो. डेबोरा आणि अँडरसन यांनी प्रत्येक गोष्टींना तडा देत आज सुखी संसार करत आहेत. काही असो पण बहीण भावाच्या नात्याचं असं लग्नाचं नातं आजही मान्य करणं जरा कठीणच आहे.