मोबाइलचा पासवर्ड न सांगितल्यामुळे पत्नीने रागाने पतीला जाळलं

कुठे घडला हा धक्कादायक प्रकार 

Updated: Jan 20, 2019, 09:01 AM IST
मोबाइलचा पासवर्ड न सांगितल्यामुळे पत्नीने रागाने पतीला जाळलं  title=

मुंबई : हल्ली मोबाइल फोन आपल्याला नात्यापेक्षा अधिक महत्वाचा झाला असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मोबाइलच्या नादात पत्नीने पतीला चक्क जिवंत जाळलं आहे. जळलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. ही बाब इतकी धक्कादायक आहे की, हा प्रकार अगदी वाऱ्यासारखा सगळीकडे पसरला. आज मोबाइलने आपल्या मनावर ताबा मिळवला असल्याचं समोर आलं आहे. माणूस व्यसनाच्या आधीन जातो अगदी त्याप्रमाणेच माणसाला मोबाइलचा व्यसन जडलं आहे. 

हा संपूर्ण प्रकार इंडोनेशियातील वेस्ट नुता तेंगारा प्रांतातील इस्ट लोम्बाक रिजेन्सीमध्ये घडला आहे. इथे राहणाऱ्या 25 वर्षीय इल्हाम चहयानीने आपला 26 वर्षीय पती डेडी पूरानामाकडे काही कारणास्तव मोबाइलचा पासवर्ड मागितला. डेडीने जेव्हा पासवर्ड देण्यास नकार दिला तेव्हा पती-पत्नीमध्ये कडाक्याच भांडण झालं. वाद एवढा वाढला की, पत्नीवर त्याने हात उचलला. यावेळी रागाच्या भरात पत्नीने पतीवर पेट्रोल टाकलं आणि लायटरने आग लावली. 

एका प्रत्यक्षदर्शीने हा प्रकार पाहिला. पेटलेल्या त्या नवऱ्याला पाहून ती व्यक्ती खूप घाबरली. डेडी पूर्णपणे भाजला होता. त्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केलं. जेथे दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. पण त्या उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेडीच्या शरिराचा वरचा भाग पूर्णपणे भाजला होता. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्याचा मृत्यू झाला.