Shocking Video : जिवंत कीडा खाणं तरुणाला पडलं महाग, बघा चेहऱ्याची काय अवस्था झाली

काही दिवसांपूर्वी एक तरुणी वटवाघळाचं सूप पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर आता या तरुणीचा जीवंत किडा खातानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Jan 2, 2023, 06:04 PM IST
Shocking Video : जिवंत कीडा खाणं तरुणाला पडलं महाग, बघा चेहऱ्याची काय अवस्था झाली title=

Shocking Viral Video: चीनमधील (China) नागरिक कोणतेही प्राणी किंवा किडे मकोडे खातात असं बोललं जातं. म्हणजे साप, पालीपासून अगदी वटवाघळापर्यंत खातात असं त्यांच्याबदल्ल प्रसिद्ध आहे. त्यामुळेच कोरोनासारख्या (Corona) महामारीची सुरुवात चीनमधून झाल्याचा दावाही केला जात आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेळा चीनमधल्या स्ट्रीटफूड स्टॉलचे (StreetFood Stall) व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात स्टॉलवर चित्रविचित्र किडेमकोडे विक्रीला असल्याचं पाहिला मिळतं आणि ते काही लोकं ते खातानाही दिसतात. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होताना दिसत आहे. या व्हिडिओत एक तरुण जीवंत किडा (Insect) खाताना दिसत असून यानंतर त्याच्या चेहऱ्यावर गंभीर परिणाम झाल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. एक तरुण चॉपस्टिकच्या (Chopsticks) मदतीने एक जिवंत किडा पकडतो. त्यानंतर तो तोंडात टाकून खाऊ लागतो. यादरम्यान, त्या किडा त्या व्यक्तीच्या तोंडात डंख मारतो. याचा गंभीर परिणाम तरुणाला भोगवा लागतो. त्या तरुणाचा चेहरा पूर्णपणे सूजलेला दिसत आहे. 

हे ही वाचा : कसा करणार गुंडांचा सामना! पोलीस जवानाने रायफलमध्ये अशी भरली गोळी, व्हायरल Video पाहून धक्का बसेल

व्हायरल होणार हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ  @Instantregretss नावाने शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जातात. पण यात काही वेळा त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतात. या तरुणाचीही तीच गत झाल्याचं पाहिला मिळतंय. भविष्यात तो तरुण पुन्हा अशी चूक करणार नाही हे नक्की. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

वटवाघुळ खातानाचा तरुणीचा व्हिडिओ
काही महिन्यांपूर्वी एक तरुणी वटवाघूळ खात  आणि त्याचं सूप पित असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.