200 Whale found Dead in Australia: व्हेल मासा (Whale fish) हा समुद्रातील सगळ्यात मोठा समुद्र जीव आहे. या माश्यांच्या अनेक प्रजाती वेगवेगळ्या समुद्रात पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) समुद्र किनाऱ्यावर 200 पेक्षा अधिक मेलेले मासे पाहायला मिळाले. (Shocking More than 200 fish died on that beach)
230 माश्यांचा समूह भरकटला
ही घटना ऑस्ट्रेलियातील 'तस्मानिया' (Tasmania) मधील आहे. 'द गार्जियन'च्या (The Guardian) रिपोर्टनुसार, जवळजवळ 230 व्हेल माश्यांचा समूह 'मैक्यूरी हार्बर' इथे अडकला होता, असं स्पष्टीकरण ऑस्ट्रेलियाच्या जैव संसाधने आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. या व्हेल माश्यांच्या समुहातील काही व्हेल मासे जिंवत आहेत, पण काही जणांचं म्हणं आहे की, सगळेच मासे मेले आहेत. मात्र मेलेल्या माश्यांचा आकडेवारीसंदर्भात विभागाकडून काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही.
मासे एकाचवेळी मेले कसे?
या घटनेनंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे इतके सगळे मासे एकाचवेळी कसे मेले? काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पश्चिम समुद्री किनाऱ्यावर 'स्पर्म व्हेल' (sperm whale) वाहुन आल्या होत्या, असा रिपोर्ट समोर आला होता. इतक्या मोठ्या संख्येत स्पर्म व्हेल्सचे समुद्री किनाऱ्यावर येणे अशक्य बाब आहे पण त्यांची संख्या 14 सांगण्यात आली होती. या घटनेच्या काही दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाच्या तस्मानिया किनाऱ्यावर जवळजवळ 230 व्हेल मासे लाटांसोबत वाहून आले होते, ज्यातून 200 पेक्षा अधिक मासे मरणावस्थेत आढळले.
आणखी वाचा... अबब! 'ही' आहे जगातली सर्वात उंच तरुणी; कर्तृत्वंच नाही तिची उंचीही जगात भारी
धक्कादायक!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे सगळे व्हेल मासे एकाच रेषेत मेलेले आढळले. एक्सपर्ट्सनुसार, अशा प्रकारचे मासे बऱ्यापैकी सोशल असतात आणि ते गटामध्ये पाहिला मिळतात. काही तज्ज्ञांच्या मते, या गटातील काही मासे सुमद्रात रस्ता भटकले आणि त्यांचाच पाठलाग करत इतर मासे या सुमद्र किनारी आले. समुद्र किनारी पाणी कमी असल्यामुळे या माश्यांचा मृत्यू (Death of fish) झाला अंदाज लावण्यात येतो आहे.
यापूर्वीही घडल्या अशा घटना
एका अहवालानुसरा साधारण 2 वर्षापूर्वी याच परिसरात 500 हून अधिक 'पायलेट व्हेल'चा (Pilot Whale) एक गट समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकला होता. त्यावेळी फक्त 100 माश्यांचा जीव वाचवण्यात यश आलं होतं. एवढ्या मोठ्या संख्येने व्हेल मासे समुद्र किनाऱ्यावर येणामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अशाप्रकारे एवढ्या मोठ्या संख्येने माश्यांचा मृत्यू हे ही चिंतेची बाब आहे.