MP Watching Porn: खासदार भरसंसदेत पाहत होता Porn, संपूर्ण देशाने Live पाहिलं, एकच खळबळ

MP Watching Porn: संसेदत सभागृहात खासदार Porn पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर खासदाराला राजीनामा (MP Resignation) द्यावा लागला. याप्रकरणी सहकारी खासदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही नेहमीच एक अश्लील खासदार म्हणून ओळखले जाल असं एका खासदाराने म्हटलं आहे.   

Updated: Feb 9, 2023, 05:10 PM IST
MP Watching Porn: खासदार भरसंसदेत पाहत होता Porn, संपूर्ण देशाने Live पाहिलं, एकच खळबळ title=

MP Watching Porn: सर्बिया (Serbia) येथे एका खासदाराचा Porn पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संसदेच्या टीव्ही चॅनेलवर कामकाजाचं प्रसारण होत असताना कॅमेऱ्यात खासदार Porn पाहताना कैद झाले आहेत. याप्रकरणी खासदाराल राजीनामा द्यावा लागला आहे. याप्रकरणी सहकारी खासदाराने त्यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. 

रिपोर्टनुसार, सभागृहात एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु होती. यावेळी Serbia च्या  Socialist Party चे खासदार ज़्वोनिमिर स्टीविक सभागृहात Porn पाहत होते. स्टीविक आपल्या मोबाइलमध्ये Porn पाहत  असताना संसदेच्या टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

'नेहमीच अश्लील खासदार राहणार'

स्टीविक यांचा सहकारी खासदार इविका डेसिक यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'ही एक भयंकर घटना आहे. हा एक स्कँडल आहे. स्टीविक यांनी राजीनामा देणंच योग्य आहे. तुम्ही आता या पदावर राहू शकत नाही. तुम्ही नेहमीच एक अश्लील खासदार म्हणून ओळखले जाल'.

पण ही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. याआधी गतवर्षी ब्रिटीश खासदार नील पैरिश (Neil Parish) सभागृहात Porn पाहताना कैद झाले होते. यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर त्यांनी यावर व्यक्त होता ही पूर्णपणे माझी चूक असल्याचं कबूल केलं होतं.