मुंबई : आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असेल. हा प्रवास तसा महाग असतो, परंतु तो तुमचा वेळ नक्की वाचवतो. आपल्याला तर हे माहित आहे की, विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना चहा-कॉफी किंवा नाष्टा दिला जातो. विशेषतः चहाप्रेमींसाठी लांबच्या प्रवासात चहा मिळणे हा दिलासा देणारा क्षण असतो. ही सगळी सेवा आपल्याला विमानात असलेले एअर होस्टोस देतात.
परंतु तुम्हाला माहितीय का की, आपल्याला नाष्टा-चहा देणारे हे एअर होस्टेस विमानातील चहा-कॉफी पिऊ शकत नाहीत. होय हे खरं आहे आणि याचा खुलासा खुद्दं एका एअर होस्टेसने केला आहे.
व्यवसायाने प्रसिद्ध टिकटोकर आणि एअर होस्टेस, सिएरा मिस्टने विमानातील अशा काही गोष्टींचा खुलासा केला आहे, जे ऐकल्यानंतर तुम्ही विमानात चहा पिण्यापूर्वी नक्कीच विचार कराल.
सिएराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिएराने विमानाशी संबंधित काही रहस्ये उघड केली आहेत.
या व्हिडीओमध्ये सिएराने सांगितले की, केबिन क्रू देखील विमानात असलेली पाण्याची बाटली वापरणे टाळतात. सिएराने सांगितले की, "मी तुम्हाला फ्लाइट अटेंडंटशी संबंधित काही रहस्ये सांगेन, जे तुम्हाला कदाचित माहित नसतील.
सिएरा म्हणाली की "आम्ही विमानात मिळणारा चहा आणि कॉफी पीत नाही. कारण ज्या टाकीतून पाणी येते ती कधीही साफ केली जात नाही. तथापि, एअरलाइन्सचं असं म्हणणं आहे की, ते पाण्याची शुद्धता तपासतात, परंतु टाकीत काहीतरी घाण सापडेपर्यंत ती साफ केली जात नाही."
पुढे आणखी एक सिक्रेट सांगत सिएरा म्हणाली की, एअर होस्टेस नेहमीच फ्लाइटच्यावेळी सनस्क्रिन लावतात. याचं कारण सांगत ती म्हणाली की, "आम्ही हे यासाठी करतो की, एका धातूच्या ट्यूबमधून आम्ही 3500 उंचावर उडत असतो. जो ओझोन पट्याच्या खूपच जवळ आहे. आम्ही रेडिएशनच्या इतके जवळ आहोत की, आरोग्य विमा कंपनी आम्हाला अंतराळवीर एअर रेडिओलॉजिस्टच्या श्रेणीत ठेवतात."