संशोधकांना सापडलेला 'हा' कंगवा किती प्राचीन माहित आहे? यावर लिहिलंय जगातील सर्वात पुरातन वाक्य

दुर्मिळ प्राचीन वस्तू सोधण्यात संशोधकांना यश, संशोधकांना सापडला तब्बल इतक्या वर्षांपूर्वीचा कंगवा

Updated: Nov 10, 2022, 05:54 PM IST
संशोधकांना सापडलेला 'हा' कंगवा किती प्राचीन माहित आहे? यावर लिहिलंय जगातील सर्वात पुरातन वाक्य title=

Trending News : उत्खननात, अन्य संशोधनात किंवा सर्वेक्षणात अनेक प्राचीन वस्तू (Antiques) सापडतात. या वस्तूंना पुरातत्वीय (Archaeology) अवशेष असंही म्हटलं जातं. मानवाने मागे ठेवलेल्या वस्तूरूप पुराव्यांवरून सांस्कृतिक इतिहास शोधणं आणि पुढच्या पिढीला त्याची माहिती होण्याच्या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वाचं ठरतो. अशीच एक प्राचीन वस्तू सोधण्यात संशोधकांना यश आलं आहे. ही वस्तू आहे कंगवा. 

कंगव्यावर प्राचीन भाषेतील वाक्य
या कंगव्यावर प्राचीन भाषेत वाक्य कोरण्यात आली आहे. संशोधकांच्या मते जगातील हे सर्वात पुरातन वाक्य असावं. यावरुन लिखित संवादाची प्रक्रिया प्राचीन काळापासून चालत असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. एका अहवालानुसार इस्त्रायलच्या (Israel) लेचाईश या शहरात संशोधकांना उवा काढण्याचा कंगवा सापडला.  वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार हा कंगवा साधारण 3800 वर्ष जूना आहे. ज्यावर प्राचीन भाषेत वाक्य कोरण्यात आलं होतं. संशोधकांच्या मते ही त्यावेळची भाषा असावी. लेचाईस हे प्राचीन काळात जूडाह साम्राज्याचं दुसरं सर्वात मोठं शहर होतं. 

संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार या कंगव्यावर कैनानाईट भाषेत लिहिण्यात आलं आहे. हा कंगवा हत्तीच्या दातापासून बनवण्यात आला आहे. या कंगव्यावर जे वाक्य कोरण्यात आलं आहे ती एकूण 17 केनानाईट अक्षरं आहेत. 3800 वर्ष या जुन्या कंगव्याची रुंदी 3.5 सेंटीमीटर आहे, तर लांबी 2.5 सेंटीमीटर आहे.