नवी दिल्ली : अब्जाधीश असलेला सौदी अरबचा प्रिन्स अल्वालीद बिन तलाल याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
अटक झाल्यानंतर अल्वालीद बिन तलालच्या कंपनीला फक्त 48 तासांत प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांची संपत्ती 1.2 अब्ज डॉलर (सुमारे 78 अब्ज रुपये) आहे. अटकेनंतर त्याच्या किंगडम होल्डिंग कंपनी (KHC)ला मोठं नुकसान झालं आहे. ही कंपनी सौदी अरेबिया मधील सर्वात मोठ्या गुंतवणूक कंपन्यांपैकी एक आहे. 19 बिलियनवरुन त्यांची संपत्ती 17.8 बिलियन झाली
आहे.
सोमवारी, केएचसीचा स्टॉक शेअर गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी स्तरावर बंद झाला. 2013 'फोर्ब्स' प्रोफाईलनुसार प्रिंसकडे एक मार्बल फिल्ड आहे. त्याच्या अलिशान घरामध्ये, 420-खोल्या आहेत. खाजगी बोईंग 747 विमान आणि राजधानीच्या किनाऱ्यावर 120 एकरवर एक रिसॉर्ट आहे. रिसॉर्टमध्ये 5 भव्यं घरे, 5 कृत्रिम तलाव आणि एक छोटा ग्रँड कॅन्यन आहे.