Russia Ukraine News : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिकचा काळ लोटला आहे. जगभरातील देश युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही युद्धविरामसाठी पुढाकार घेतला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना संपवण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन अब्जाधीश आणि अनौपचारिक शांतता वार्ताकार रोमन अब्रामोविच यांच्या भेटीदरम्यान रशियन अध्यक्ष म्हणाले, 'जा आणि झेलेन्स्कीला सांगा, मी त्याला संपवून टाकेल.' रोमन यांनी पुतीन यांना युक्रेनच्या अध्यक्षांचे हस्तलिखित शांतता प्रस्ताव पत्र दिले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुतिन यांनी ही धमकी दिली. वृत्तानुसार, चर्चेदरम्यान मध्यस्थी दिसून आली, परंतु जमिनीवर स्थिती अडकली.
24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. सुमारे एक कोटी लोक विस्थापित झाले आहेत. घरे, शाळा, रुग्णालये आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. एवढ्या विध्वंसानंतरही रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा मार्ग दिसत नाहीये. चौफेर दबाव असतानाही रशिया मागे हटायला तयार नाही.
याआधीही रशियाने अनेकदा धमक्या दिल्या आहेत. अमेरिका आणि नाटो यांच्यात बैठक होणार होती, तेव्हाही रशियाचा रोष चव्हाट्यावर आला होता. रशियाने तर युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली होती. रशियाकडे जगातील सर्वात जास्त अण्वस्त्रांची खेप आहे.