मास्को : रशियाने अमेरिकेच्या उच्चायुक्त दर्जाच्या ६० अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. तसेच, सेंट पीटर्सबर्ग येथील अमेरिकी दुतावसही बंद करणयाचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या या निर्णयाकडे अमेरिकेच्या निर्णयाची प्रतिक्रिया म्हणून पाहिले जात आहे. ब्रिटनमध्ये माजी गुप्तहेरावर विषप्रयोग केल्याचा आरोप रशियावर ठेवण्यात आला आहे. या आरोपावरूनच अमेरिकेने रशियाच्या ६० अधिकाऱ्यांना देशाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, देशातील रशियाचे दुतावासही बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लोवरोव यांनी गुरूवारी सांगितले की, मॉस्कोमध्ये अमेरिकी मिशनचे ५८ कर्मचारी आणि येकातेरिनबर्गचे २ कर्मचाऱ्यांना कुटनितीत दोषी आढळल्याने अपात्र ठरविण्यात आले आहे. या ६० अधिकाऱ्यांना ५ एप्रिलपर्यंत रशियाबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लावारोवने म्हटले की, अमेरिकी राजदूत जॉन हंट्समॅन यांना परराष्ट्र मंत्रालयातून काढून टाकले होते. 'द हिल मॅग्जिन'च्या रिपोर्टनुसार रशियाने घोषणा केल्यानंतर काही काळातच व्हाईटहाऊसवरून प्रतिक्रया आली की दोन्ही देशांमधील संबध ताणले जाऊ शकतात. प्रसारमाध्यम सचिव सारा हुकाबी सॅंडर्सनी म्हटले की, 'रशियाकडटून अशा प्रकारची प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. अमेरिका हे प्रकरण त्यांच्या पद्धतीने हातालेन.' विदेश विभागाच्या प्रवक्ता हीथर नॉर्ट यांनी म्हटले की, 'रशियाच्या वर्तनाचा आम्ही निशेध करतो. आमची कारवाई ही ब्रिटनमध्ये झालेल्या गुप्तहेरावरील हल्ल्याची प्रतिक्रिया होती. पण, रशियाच्या सध्याच्या निर्णयाचे तर काहीच आचित्य नाही.'
दरम्यान, रशियाने आपल्या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की, आम्ही पश्चिमेकडील राष्ट्रांसोबत कोणत्याही प्रकारे शितयुद्ध सुरू केले नाही. राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी पत्रकारांना सांगितले की, 'रशियाने कोणत्याही प्रकारचे शितयुद्ध सुरू केले नाही. रशियाने कधीही प्रितक्रियात्मक उत्तरात बदल्याची कारवाई केली नाही.'