संपूर्ण शहरात राहतो एकटा व्यक्ती

 एका संपूर्ण शहरात फक्त एक व्यक्ती राहत असल्याचे तुम्हांला कोणी सांगितले तर तुम्हांला ते खरे वाटणार नाही. पण हे सत्य आहे. जपानच्या तोमिओका शहरात एकच व्यक्ती राहतो. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 10, 2017, 07:07 PM IST
 संपूर्ण शहरात राहतो एकटा व्यक्ती  title=

तोमिओका :  एका संपूर्ण शहरात फक्त एक व्यक्ती राहत असल्याचे तुम्हांला कोणी सांगितले तर तुम्हांला ते खरे वाटणार नाही. पण हे सत्य आहे. जपानच्या तोमिओका शहरात एकच व्यक्ती राहतो. 

संपूर्ण शहरात हा एकमेव व्यक्ती राहतो, यामागे काय कारण आहे. ते आज आम्ही तुम्हांला सांगतो. 

Naoto Matsumara

मीडिया रिपोर्टनुसार जपानच्या तोमिओकामध्ये २०१० मध्ये सुमारे १५ हजार लोक राहत होते. पण त्सुनामी आली आणि फुकूशिमा दायची न्युक्लिअर प्लांटमध्ये गळती सुरू झाली. त्यामुळे येथे रेडिएशन वाढले. या रेडिएशनचा परिणाम तोमिओका शहरावरही जाणवला. रेडिएशनच्या भीतीने येथून सर्व लोक पळून गले. पण ५८ वर्षांचे नाओतो मत्सुमुरा एकटेच या शहरात राहिले. ज्यांनी या शहरातून जायला नकार दिला. त्यांना शहरातील जनावर आणि प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करायची होती. त्यामुळे ते एकटेच या शहरात राहिले. 

Naoto Matsumara

एका मुलाखतीत मत्सुमुरा म्हणाले, जेव्हा भूकंप आला तेव्हा मी काम करत होता. त्यांना समजले की त्सुनामी येणार आहेत त्यामुळे ते घरी पोहचण्यापूर्वी त्सुनामीची वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी  न्यूक्लीअर प्लांटमध्ये स्फोट झाल्याचा त्यांना आवाज आला.  हा खूप मोठा स्फोट होता. 

Naoto Matsumara

या घटनेनंतर एक संपूर्ण शहर रिकामे झाले. लोकांनी या शहराला सोडले आणि दुसरीकडे राहायला गेले. मत्सुमुरा पण या दरम्यान इवाकीमध्ये आपल्या काकूच्या घरी गेले होते. पण त्या ठिकाणी त्यांना राहण्याची परवानगी मिळाली नाही.  तेथील लोकांचे म्हणणे होते की ते लोक दुषित झाले आहेत. एका रिपोर्टनुसार मत्सुमुरा यांच्या कुटुंबातील लोक तोमिओका शहरापासून १८ मैल दूर आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे.