मुंबई : पबजी मोबाइल जगातील टॉप मोबाइल व्हिडिओ गेम्सपैकी एक आहे. भारतासह संपूर्ण जगात पबजीचे असंख्य चाहते आहेत. पबजी चाहता वर्ग इतका आहे की २०१९ पासून याचं वेड आपण अनुभवतोय. अनेकांनी तर या पजबीच्या प्रेमापोटी खाण-पिण देखील सोडून दिलं होतं. एवढंच नव्हे तर घरात पबजी खेळण्याला विरोध होत होता म्हणून पबजी प्रेमींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.
आता पबजी प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक माहिती. ४ एप्रिल रात्री १२ ते ५ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत शटडाऊन करण्यात येणार आहे. पबजी जवळपास १२ तासांसाठी बंद राहणार आहे.
शटडाऊनबाबत कंपनीने स्वतः युझर्सला माहिती दिली आहे. कंपनीने युझर्सला 'Temporary Suspension of Service'या नावाची नोटीस दिली आहे. आता प्रश्न असा पडला आहे की, पबजीने का शटडाऊन केलं.
पबजी गेमची पॅरेंट कंपनी Tencent ने चीच्या सोशल मीडिया ऍप वीबोवर याची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनामुळे जगभरात एक भीतीचं वातावरण आहे. हजारो लोकांचा कोरोनाने बळी घेतला असून लाखो लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरससारख्या महामारी विरूद्ध लढताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या लोकांना आदरांजली वाहण्यासाठी कंपनीने पबजी काही तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात पबजी शटडाऊन होणार की नाही याबात अद्याप कंपनीने कोणतीच माहिती दिलेली नाही.