पेशावर : पाकिस्तानच्या सर्वसाधारण निवडणुकीत एका खासदाराने आपण 'चहावाला' असल्याचे सांगत जोरदार प्रचार केला पण खऱ्या आयुष्यात तो करोडपती असल्याचे नंतर साऱ्यांच्या लक्षात आले. इमरान खानची पार्टी पाकिस्तान तहरीक एक इंसाफ (पीटीआय) चा हा खासदार आहे. पाकिस्तानच्या निर्वाचन आयोगासमोर आलेल्या दस्तावेजानुसार जियो टीव्हीने हे वृत्त दिलंय.
पख्तुनख्वा राज्यातील एनए ४१ (बाजौर) येथील जागेसाठी लढणाऱ्या पीटीआय खासदार गुल जफर खान यांच्याकडे ३ कोटींची संपत्ती आहे. या खासदारांचा कपड्यांचा व्यापार आहे. यानुसार जफर यांच्याकडे एक कोटींची कॅश तर घर आणि शेतीच्या जागेची किंमत १ कोटी २० लाख आहे. इमरान खानच्या पीटीआयच्या तिकिटावर लढणाऱ्याआधी तो रावळपिंडीतील एका हॉटेलात चहा बनवत असे अशी निवडणुकीआधी चर्चा होती. पाकिस्तानमध्ये २५ जुलैला झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत चहा विकतानाचे फोटो व्हायरल झाले होते. चहा बनवतानाचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
शिक्षण आणि संस्थानात सुधार आणणं हे आपलं मुख्य लक्ष्य असल्याचे त्या खासदाराने सांगितल्याचे जियो चॅनलने म्हटलंय. पाकिस्तानामध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीनंतर १९ दिवसांनंतर नवनिर्वाचित खासदारांचे पहिले सत्र सुरू होणार आहे. संविधानानुसार एनएचे पहिले सत्र २१ दिवसांनी सुरू होणं आवश्यक आहे. याच्या काही दिवसानंतर नॅशनल असेंबली सदनाचे नेता (पंतप्रधान) निवडणूक प्रक्रिया सुरू करेल.