नवी दिल्ली : शाळा म्हटलं की काही नियम आले मात्र एका शाळेनं अजब दावा करून एक बो घालण्यावर बंदी घातली आहे. या शाळेनं केलेला दावा वाचून तुम्हालाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की एक बो घातलेल्या मुलींना पाहून मुलं उत्तेजित होऊ शकतात? मात्र असा दावाच एका शाळेनं केला आहे. हा दावा करून एक बो बांधण्यावर शाळेनं बदी आणली आहे.
शाळा शाळेनं मुलींना एक बो बांधण्यासाठी बंदी घातली आहे. यामागे कारण देत शाळेनं म्हटलं आहे की यामुळे मुलांमध्ये उत्तेजना निर्माण होऊ शकते त्यामुळे मुलींना एक बो घालून शाळेत येऊ नये. त्यामुळे या शाळेतील मुली एक बो घालून शाळेत येऊ शकत नाहीत.
एका वृत्तपत्रानं दिलेल्या अहवालानुसार जपानच्या एका शाळेत एक बोसोबत आणखी काही अजब नियम लागू करण्यात आले आहेत. इथल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मोजांपासून ते अंतर्वस्त्रांपर्यंत अनेक विचित्र नियम लावण्यात आले आहेत. शाळेत मुलींनी पांढऱ्या रंगाची अंतर्वस्त्र घालावीत असाही नियम ठेवला आहे.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे हे सगळे नियम जपानमधील एक शाळेत लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त करण्यात आला आहे. केसांचा रंगही काळाच असायला हवा असा अट्टाहास या शाळेमध्ये आहे. इतर कोणताही केसाचा रंग असेल तर त्या विद्यार्थिनीला प्रवेश मिळणार नाही.
शाळेचा विचित्र दावा
या नियमांना घेऊन 2020 मध्ये जपानच्या फुकुओका भागातील शाळांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये सांगण्यात आलं होतं की सिंगल बो घातल्यानंतर मुलींची माग दिसते. जी मुलांना उत्तेजित होण्यासाठी भावना निर्माण करते. त्यामुळे सिंगल बो घालण्यावर शाळेनं बंदी घातली आहे. त्यामुळे शाळेचा नियम असल्याने विद्यार्थ्यांनी तो पाळणं बंधनकारक असल्याने विद्यार्थिनींजवळ आणखी कोणताही पर्याय उरला नाही.