निलंबन संपल्याने पोलिसाचा डान्स, पण व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा निलंबित

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इन्स्पेक्टरचा एक व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडमधील 'होश ना खबर है' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Updated: Jun 13, 2021, 09:19 PM IST
निलंबन संपल्याने पोलिसाचा डान्स, पण व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा निलंबित title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इन्स्पेक्टरचा एक व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडमधील 'होश ना खबर है' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. निलंबन संपल्यानंतर हा पोलीस अधिकारी पुन्हा रुज्जूहोत असल्याने त्याला आनंद आवरला नाही. पण लगेचच त्याचा आनंदावर पाणी फेरलं.

हा व्हायरल व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी कारवाई करून या पोलिसाला तात्काळ पुन्हा निलंबित केले. सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की, ज्या मित्रांमुळे इंस्पेक्टरला प्रथम निलंबित करण्यात आले होते, तेच मित्र आणि सहकारी दुसऱ्यांदा निलंबनाचे कारण बनले. कारण ही पार्टी त्यांच्यामार्फत आयोजित केली गेली होती.

पाकिस्तानच्या 'एक्सप्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सब इंस्पेक्टरचे नाव अबिद शाह असून तो कराचीच्या लियाकताबाद पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे.

'दिलबर, दिलबर, होश ना खबर है' या हिट बॉलिवूड गाण्यावर आबिद शहा आपल्या मित्रांसोबत साध्या कपड्यांमध्ये नृत्य करताना दिसतोय. आबिदला हे माहित नव्हते की मित्रांसह नृत्य केल्याने त्याचे पुन्हा निलंबन होईल.