ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती

एखादी बऱ्यापैकी स्थिर अर्थव्यवस्था, स्थिर राजकीय स्थिती एखाद्या महत्वाकांक्षी राजकारणी व्यक्तीमुळे कशी अस्थिरतेच्या गर्तेत लोटली जाते यांचं उत्तम उदाहरण आज ब्रिटनमध्ये बघायला मिळतंय. आज जाहीर झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांच्या अतिधाडसी निर्णय ब्रिटीश जनतेला अनिश्चितेच्या नव्या अंधारात लोटणारा ठरणार आहे.

Updated: Jun 9, 2017, 03:24 PM IST
ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती title=

लंडन : एखादी बऱ्यापैकी स्थिर अर्थव्यवस्था, स्थिर राजकीय स्थिती एखाद्या महत्वाकांक्षी राजकारणी व्यक्तीमुळे कशी अस्थिरतेच्या गर्तेत लोटली जाते यांचं उत्तम उदाहरण आज ब्रिटनमध्ये बघायला मिळतंय. आज जाहीर झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांच्या अतिधाडसी निर्णय ब्रिटीश जनतेला अनिश्चितेच्या नव्या अंधारात लोटणारा ठरणार आहे.

नव्या आणि सकारत्मक सुरुवातीच्या आशेनं साखर झोपेतल्या लंडनवासियांची सकाळी सकाळी धक्का बसला. थेरेसा मे यांनी मोठ्या उत्साहात जाहीर केलेली मध्यावधी निवडणूक हुजूर पक्षाच्या अंगाशी आली आहे. १८ एप्रिल २०१७ रोजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रिटीश संसदेत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली.

प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना आत्मविश्वासानं मैदानात उतललेल्या मे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गुरुवारी ब्रिटीश नागरिकांनी मात्र चांगलाच धक्का दिलाय. डेव्हिड कॅमरुन यांच्या नेतृत्वात 331 जागांसह मिळालेलं स्पष्ट बहुमत हुजूर पक्षांनं गामावलंय. आणि साऱ्या देशाला अस्थिरतेच्या नव्या गर्तेत लोटलंय.

मध्यावधी निवडणूकीचा जुगार थेरेसा मे खेळल्या त्याचं कारणही जगाला बुचकळ्यात टाकणारं होतं. 

मध्यावधीचा जुगार कशासाठी होता?

पुढच्या काही दिवसात ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू करायची आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे. या संपूर्ण काळासाठी सत्तेत एकच सरकार सत्तेत असावं, प्रक्रियेच्या मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली आणि सरकार बदललं तर सगळी प्रक्रिया धोक्यात येईल अशी थेरेसा मे यांना
भीती होती.