बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीच्या बर्लिनमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या सहा दिवसांच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. चार देशांचा हा दौरा असणार आहे. जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्सला ते भेट देणार आहेत.
या देशांशी आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी आणि भारतातली गुंतवणूक वाढवण्याच्या उद्देशानं हा दौरा असणार आहे. जर्मनीपासून त्यांच्या दौ-याची सुरुवात होईल. जर्मनीत पंतप्रधान मोदी चॅन्सलर अँजेला मार्केल आणि अध्यक्ष फ्रँक वॉल्चट स्टीनमीअर यांना भेटणार आहेत. बर्लिनमध्ये मोदी आणि मार्केल हे दोघेही दोन्ही देशांतल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर उद्या मोदी स्पेनला रवाना होतील.