या पाच देशांत मिळतं सर्वात स्वस्त पेट्रोल

आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, जगात असेही काही देश आहेत ज्या ठिकाणी पेट्रोल एक रुपयांपेक्षाही स्वस्त दरात मिळतं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 15, 2017, 05:32 PM IST
या पाच देशांत मिळतं सर्वात स्वस्त पेट्रोल title=
File Photo

नवी दिल्ली : आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, जगात असेही काही देश आहेत ज्या ठिकाणी पेट्रोल एक रुपयांपेक्षाही स्वस्त दरात मिळतं.

पेट्रोलच्या दरवाढीवरुन सध्या संपूर्ण देशात गदारोळ सुरु आहे. पण असाही एक देश आहे ज्या ठिकाणी पेट्रोलची किंमत केवळ ६४ पैसे प्रति लिटर आहे. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पाच देशांसंदर्भात सांगणार आहोत जेथे पेट्रोलचे दर नसल्याच्या बरोबर आहे.

व्हेनेझुऐला

व्हेनेझुऐलामध्ये पेट्रोलचे दर खुपच कमी आहेत. इतके कमी की तुम्हाला वाटेल आपली गाडी घेऊन येथेच पेट्रोल भरावं. व्हेनेझुऐलात पेट्रोल अवघ्या ६४ पैसे एक लिटर दराने मिळतं. आर्थिक टंचाई आणि राजकीय उलथापालथ झालेली असतानाही व्हेनेझुऐला या देशात पेट्रोल सर्वात स्वस्त मिळते.

सौदी अरब

सौदी अरबमध्ये पेट्रोलचा दर १५.३८ रुपये प्रति लिटर आहे. हा जगातील दहावा सर्वात श्रीमंत देश आहे. भारत आणि सौदी अरब यांच्यात चांगले संबंधही आहेत. या ठिकाणी ९५% वाळवंटच आहे. या देशात पाण्याची किंमतही पेट्रोलपेक्षा अधिक आहे.

तुर्कमेनिस्तान

तुर्कमेनिस्तान हा एक असा देश आहे ज्याची लोकसंख्या भारतातील एखाद्या लहान राज्यापेक्षाही कमी आहे. या ठिकाणी पेट्रोल १८.५८ रुपये प्रति लिटर या दराने मिळतं. या देशात मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत.

अल्जेरिया

हा जगातील दहाव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. या ठिकाणी पेट्रोल २०.५१ रुपये दराने मिळतं. या देशात मुख्यत: तीन भाषा बोलल्या जातात. अरबी, फ्रेंच आणि बर्बर या भाषा आहेत. 

कुवैत

कुवैत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत देश आहे. या ठिकाणी पेट्रोलचा दर प्रति लिटर २२.४३ रुपये आहे. या देशातील ९५ टक्के तेलसाठा हा निर्यात केला जातो. तर एकूण महसूलापैकी ८० टक्के महसूल हे तेल आणि तेलापासून बनविलेल्या पदार्थांपासून मिळतं.