परवेज मुशर्ऱफ यांना फाशीची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्ऱफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Updated: Dec 17, 2019, 01:02 PM IST
परवेज मुशर्ऱफ यांना फाशीची शिक्षा  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्ऱफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विेशेष न्यायालयाने नुकताच हा निर्णय दिला आहे. परवेज यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावलीय. देशद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. मुशर्रफ यांनी पाकिस्तानात ३ नोव्हेंबर २००७ ला आणीबाणी जाहीर केल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा आरोप ठेवण्यात आला होता.

२०१३ पासून त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी प्रलंबित होती. त्यानंतर मुशर्रफ यांनी प्रकृतीचं कारण देत मार्च २०१६मध्ये दुबईला पळ काढला होता.

त्यांनंतर कोर्टानं त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते सुनावणीला गैरहजर राहिले होतेय. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. तसंच कोर्टानं त्यांना अटक करण्याचे आदेश एफआयएला दिले होते.