प्रचंड उष्णतेनं पूल तुटला; पण कसा ?

उष्णतेमुळं कोणताही पूल कसा कोसळू शकतो? हे विचार करणं सुद्धा आश्चर्यचकित करणारं आहे. पण हे खरं आहे . प्रचंड उष्णतेमुळे पाकिस्तान आणि चीनला जोडणार पूल तुटला आहे

Updated: May 11, 2022, 03:19 PM IST
प्रचंड उष्णतेनं पूल तुटला; पण कसा ? title=

इस्लामाबाद: उष्णतेमुळं कोणताही पूल कसा कोसळू शकतो? हे विचार करणं सुद्धा आश्चर्यचकित करणारं आहे. पण हे खरं आहे . प्रचंड उष्णतेमुळे पाकिस्तान आणि चीनला जोडणार पूल तुटला आहे. हुंजा व्हॅली पूल तुटल्यामुळे पाकिस्तानचा चीन सोबतसंपर्क तुटला आहे. संपूर्ण दक्षिण एशियामध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. नागरिक उष्णतेमुळे त्रस्त आहे. याच उष्णतेमुळे हसनाबाद पूल तुटलाय. 

उष्णतेमुळे कसा तुटला पूल

POK च्या गिलगिट- बाल्टिस्तानचा ऐतिहासिक हसनबाद पूल (Hassanabad Bridge) शनिवारी तुटला. प्रचंड उष्णतेमुळे शिस्पर ग्लेशियर वितळला. त्यामुळे अचानक पूर आला. या पुराच्या पाण्यात जे आलं ते वाहून गेलं. याच पुराचा फटका ऐतिहासिक हासनाबाद पुलाला बसला आणि संपूर्ण पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. 

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता. या पुलाचा भाग हाळूहाळू कोसळत आहे. आणि पाहाता पाहाता संपूर्ण पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. तसं पाहिलं तर अशी दृश्य पावसाळ्यात समोर येतात. मात्र ही दृश्य उन्हाळ्यात पाहण्यास मिळत आहे.